Ind vs Sa 1St T20i Delhi Boy Captaincy : दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रिषभ पंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतसाठी आजचा दिवस म्हणजे ९ जून २०२२ हा खूपच खास आहे. कारण पंत आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्याच्या घरच्या मैदानावर भारताचे कर्णधारपद भूषवत आहे. यासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भारताचा 8वा कर्णधार बनला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नाणेफेकीदरम्यान टी-20 संघाचा नवा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, माझ्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा अभिमानाचा दिवस आहे. कारण दिल्ली बॉय'ला दिल्लीत कॅप्टन्सी करायला मिळणे हा सन्मानच आहे. माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे. मला ही संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. या मालिकेसाठी ऋषभ पंतची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता तो कर्णधार असून बीसीसीआयने गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि निवडकर्त्यांनी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, परंतु केएल राहुलला सुरुवातीच्या एक दिवस आधी दुखापत झाली. आणि तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत केएल राहुल भारताचा 8वा टी-20 कर्णधार होऊ शकला नाही.
भारतीय संघाचे आतापर्यंत 7 कर्णधारांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व केले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा पहिला कर्णधार वीरेंद्र सेहवाग होता. यानंतर एमएस धोनीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि 72 सामन्यांमध्ये तो संघाचा कर्णधार होता. यादरम्यान सुरेश रैनाने 3, अजिंक्य रहाणेने 2, विराट कोहलीने 50, रोहित शर्माने 28 आणि शिखर धवनने 3 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.