India vs South Africa Twitter
क्रीडा

SA vs IND : पावसामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ पाण्यात

सुशांत जाधव

India vs South Africa (IND vs SA) 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसाने गाजवला. दुसऱ्या दिवशी खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वीच दिवस संपल्याची घोषणा करण्यात आली. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे.

सोमवारी पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही. भारतीय संघाकडून केएल राहुल (KL Rahul) च्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यावर पहिल्यापासून मजबूत पकड मिळवली आहे. पहल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 3 बाद 272 धावा केल्या होत्या. लोकेश राहुल 122 आणि अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवसाअखेर परिस्थिती जैसे थी आहे.

भारताकडून मयांकसह राहुल अजिंक्यची लक्षवेधी खेळी

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल जोडीनं पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी रचली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा केल्या. मयंकने 123 चेंडूत 60 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या पुजाराला खातेही उघडता आले नाही. कोहलीने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली.

लुंगी एनिग्डिनं सोडली छाप

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर हिरवळ दिसत असतानाही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज घरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करतील, असे वाटत होते. पण यात ते अपयशी ठरले. एनिग्डीनं एकट्याने पहिल्या तीन विकेट मिळवून दिल्या. त्याच्याशिवाय अन्य गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT