India vs South Africa 1st Test Day 3 : दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसरा डाव 131 धावात संपुष्टात आणत पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी जिंकला. आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.
विराट कोहलीने 76 धावांची झुंजार खेळी केली मात्र गिलचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर मार्को येनसेनने 3 विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात नाबाद 83 धावांचे योगदान देखील दिले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 10 बाद 408 धावा केल्या. यजमानांनी पहिल्या डावात 163 धावांची मोठी आघाडी घेतली होती.
मार्को येनसेनने 76 धावा करून एकाकी झुंज देणाऱ्या विराट कोहलीला बाद करत भारताचा दुसरा डाव 131 धावात संपवला. याचबरोबर भारताचा एक डाव आणि 31 धावांनी पराभव झाला.
भारताची रन मशिन विराट कोहलीने एक बाजू लावून धरत अर्धशतकी खेळी केली मात्र त्याला साथ देणारे फलंदाज स्वस्तात माघारी गेले. गेल्या डावातील शतकवीर केएल राहुल दुसऱ्या डावात 4 धावा करून बाद झाला. तर अश्विनला खातं देखील उघडता आलं नाही. दोघांनाही नांद्रे बर्गरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
दुसऱ्या डावातही भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा ढेपाळली. मार्को येनसेनने आधी शुबमन गिलचा 26 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर श्रेयस अय्यरला देखील 6 धावांवर बाद करत भारताची अवस्था 7 बाद 72 धावा अशी केली.
रबाडाने रोहितचा त्रिफळा उडवल्यानंतर बर्गरने यशस्वी जयस्वालला 5 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.
भारताने आपला दुसरा डाव सुरू करताच कसिगो रबाडाने भारताला पहिला धक्का दिला. रबाडाने कर्णधार रोहित शर्माचा शुन्यावर त्रिफळा उडवला.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा खालच्या फळीतील फलंदाज मार्को येनसेनने दमदार फलंदाजी करत आफ्रिकेला 400 धावांच्या पार पोहचले. पहिल्या डावात 156 धावांची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 392 धावा केल्या होत्या. आणि 147 धावांची आघाडी घेतली आहे.
डीन एल्गरचे कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तो 185 धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला झेल बाद केले आहे.
एल्गर यापूर्वी दोनदा 199 धावांवर बाद झाला आहे. ही त्याची शेवटची कसोटी मालिका आहे. त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण ती वाया गेली.
दक्षिण आफ्रिकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात 360 धावा केल्या आहेत. मार्को जॅन्सन आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर आहेत.
मार्को जॅन्सननेही अर्धशतक ठोकलं आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच गड्यांच्या मोबदल्यात 338 धावा केल्या आहेत. त्यांची आघाडी 93 धावांवर पोहोचली आहे. डीन एल्गर 173 आणि मार्को जॅनसेन 50 धावांवर नाबाद आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला आतापर्यंत एकही यश मिळालेले नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात 300 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने पाच विकेट्सवर 303 धावा केल्या आहेत. आफ्रिकन संघाची आघाडी 58 धावांपर्यंत वाढली आहे. डीन एल्गर नाबाद 161 आणि मार्को जॅनसेन नाबाद 27 धावांवर खेळत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. डीन एल्गर आणि मार्को यान्सेन क्रीजवर आहेत. तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली.
सुपर स्पोर्टस् पार्क, सेंच्युरियनच्या मैदानावर प्रेक्षकांना एका दिवशी दोन संघातील दोन खेळाडूंची शतके बघायला मिळाली. भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढणाऱ्या के. एल. राहुलच्या शतकानंतर दक्षिण आफ्रिकन संघाला सुस्थितीत नेणारे डीन एल्गरचे शतक बघून प्रेक्षक खूश झाले.
राहुलच्या बहारदार शतकाने भारताला २४५ धावांचा पल्ला गाठता आला; तर डीन एल्गरच्या शतकाने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ बाद २५६ धावा करून ११ धावांची आघाडी घेतली.
पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला थोडी उशिराने सुरुवात झाली. कारण सकाळी थोडी पावसाची शक्यता वाटत होती. सिराजने राहुलसोबत भागीदारी करताना संयम दाखवता. राहुलने जबाबदारी हाती घेत चांगले फटके सातत्याने मारून धावा जमा करायचा सपाटा लावला. दक्षिण आफ्रिकेने हाती असलेले सर्व पर्याय वापरून बघितले, ज्याचा राहुलवर कोणताच परिणाम झाला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी ६ बाद १२१ धावसंख्येवर अश्विनचा बळी गेला होता.
के. एल. राहुल त्या वेळी फक्त धावांवर खेळत होता. राहुलने मग प्रथम शार्दूल ठाकूर नंतर जसप्रीत बुमरा आणि मोहंमद सिराजसोबत अजून १२४ धावा जमा केल्या, ज्यात राहुलचा वाटा ९० धावांचा होता. १४ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांसह राहुलने शतक पूर्ण केले, तेव्हा भारतीय संघ आणि प्रेक्षकांसोबत दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनीही राहुलचे टाळ्या वाजवत कौतुक केले. २४५ धावा फलकावर लागल्या असताना राहुल शेवटी बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू झाली तेव्हाही वातावरण ढगाळ होते. छोट्या धावसंख्येची पाठराखण करायला भारतीय गोलंदाजांना डावाच्या सुरुवातीला काही फलंदाज बाद करणे गरजेचे होते. एडन मार्करम आणि डीन एल्गर या संघातील सर्वात सक्षम आणि अनुभवी फलंदाजांना सलामीला पाठवून मोठी जोखीम यजमान संघाने पत्करली होती. सिराजने मार्करमला लवकर बाद करून अपेक्षित धक्का दिला होता. डीन एल्गर खेळी चालू करताना खूप वेळा चकला. गोलंदाजांनी त्याला चकवले; पण बॅट कड काही केल्या लागली नाही. जम बसल्यावर एल्गरने सुंदर फलंदाजी चालू केली.
उपाहारानंतर रोहित शर्माने एकाच वेळी प्रसिध कृष्णा आणि शार्दूल ठाकूरला गोलंदाजी देऊन मोठी चूक केली. एल्गरने त्याचा फायदा उचलत कडक कव्हर ड्राईव्हज् मारत अर्धशतक पूर्ण केले. समोर खेळणारा टोनी जोर्झीला धावा मिळत होत्या त्या खेळपट्टीच्या मागे. भागीदारी त्रासदायक ठरू लागली असताना रोहित शर्माने बुमराला परत मारा करायला बोलावले. बुमराने प्रथम जोर्झी आणि नंतर पीटरसनला पाठोपाठ बाद करून सामन्यात रंग भरला.
बुमरा आणि सिराजचा अपवाद वगळता बाकीच्या भारतीय गोलंदाजांना एल्गरने चांगलेच धारेवर धरले. एल्गर नेहमी सावध फलंदाजी करतो. मात्र १४ वे कसोटी शतक १९ कडकडीत चौकारांसह साजरे केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.