ind vs sa 5th t20 karnataka state cricket association 50 percent refund ticket 
क्रीडा

Ind vs Sa: पाऊस पडला मॅच रद्द, तिकिटाचे पैसे मिळणार पण किती?

शेवटच्या T20 सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार

Kiran Mahanavar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. शेवटच्या T20 सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहे. यांची घोषणा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केले आहे. (Ind vs Sa 5th T-20 Karnataka State Cricket Association 50 Percent Refund Ticket)

नाणेफेकीनंतर खेळाडू मैदानावर पोहोचताच पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सामना 19-19 षटकांचा करण्यात आला. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि अखेर सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान सतत पाऊस पडत होता आणि त्यामुळे शेवटचा हा निर्णायक सामना पावसामुळे रद्द केला आहे. सामना रद्द झाल्यानंतर टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.

सामन्यात एकही चेंडू टाकल्यास तिकिटाचे पैसे परत केले जात नाही, असे KSCA चे धोरण आहे. क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. युनियनने म्हटले आहे की दर्शकांचे संपूर्ण पैसे परत केले जाणार नाहीत, परंतु 50 टक्के दिले जाणार आहे. केएससीएचे खजिनदार आणि प्रवक्ते विनय मृत्युंजय म्हणाले, अटी आणि शर्तींनुसार, एकही चेंडू टाकला तरी तिकिटांचे पैसे परत मिळत नाही. मात्र KSCA ने तिकिटाच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम क्रिकेट चाहत्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT