dinesh karthik hits first half century in t20 career sakal
क्रीडा

Dinesh Karthik: तब्बल १६ वर्षानंतर दिनेश कार्तिकचे पहिले अर्धशतक

2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिकचे हे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक

Kiran Mahanavar

आयपीएल 2022 मध्ये आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर दिनेश कार्तिक 3 वर्षांनी टीम इंडियात परतला आहे. कार्तिकनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याचा आयपीएल फॉर्म कायम राखला. दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावून अनोखा विक्रम केला. (dinesh karthik hits first half century in t20 career of 16 years breaks mahendra singh dhoni record)

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा कार्तिक हा जास्त वयात अर्धशतक करणारा खेळाडू बनला आहे. वयाच्या 37 वर्षे 16 दिवसात त्याने हा पराक्रम केला आहे. त्याने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 36 वर्षे 229 दिवसांच्या वयात अर्धशतक झळकावणाऱ्या एमएस धोनीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. कार्तिकने 27 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिकचे हे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने आपल्या 40 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान हार्दिक पांड्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 203 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या. भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य ठेवले.

भारताच्या 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 87 धावात ढेर झाला. भारताने सामना तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. भारताकडून आवेश खानने भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या तर त्याला युझवेंद्र चहलने 2 तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT