पहिल्या टी २० पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. हा सामना कटकला स्टेडिअमवर होणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे आहे. कारण पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्विकारा लागल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. अशातच, माजी पूर्वी दिग्गज क्रिकेटरने दिनेश कार्तिकला संघाबाहेर ठेवण्याचे वक्तव्य केलं आहे.
स्टार स्पोर्टसशी बोलताना टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने टीम इंडियावर भाष्य केलं आहे. 'तुम्ही दिनेश कार्तिकला पहिल्या सामन्यात खेळवलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आणखी संधी द्याल. पण दीपक हुड्डा ज्या फॉर्ममध्ये होता ते पाहता त्यालाही संधी दिली जाऊ शकते, असे मला वाटते. तो तरुण आहे, पण पुढच्या सामन्यांमध्ये बदल करण्याची गरज नाही. असे मत गंभीरने यावेळी व्यक्त केली.
दीपक हुडा आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा भाग होता आणि गौतम गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता. हुडासाठी आयपीएलचा हा मोसम त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. या मोसमात त्याने 15 सामन्यात 32.21 च्या सरासरीने 451 धावा केल्या. त्याने या मोसमात 136.67 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 4 अर्धशतकेही झळकावली.
दिनेश कार्तिकचा फॉर्म पाहता त्याचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. कार्तिक तीन वर्षानंतर टीम इंडियात परतला आहे. आरसीबीकडून खेळताना कार्तिकने 1६ सामन्यात ३३० धावा केल्या आहेत. त्याला साऊथ अफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.