hardik pandya esakal
क्रीडा

घमेंड आली का?....कार्तिकला फटकारल्याने नेटकऱ्यांनी पांड्याची घेतली शाळा

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये दिसला. पण...

धनश्री ओतारी

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs Sa 1st T20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान आफ्रिकेने 5 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह क्रिकेट जगतात हार्दिक पांड्याची चर्चा रंगली आहे. त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये दिसला. त्याने 12 चेंडूवर 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. त्याचवेळी, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिकने दिनेश कार्तिकला फटकारले असल्याचे पाहायला मिळालं. पांड्याने कार्तिकला स्ट्राईक दिला नाही. पांड्याच्या या भूमिकेमुळे चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं घडलं काय?

20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यानंतर कार्तिक क्रिजवर आला. पुढील चेंडू नॉर्टजेने कार्तिकला टाकला, त्यानंतर डीके त्यावर धावा करू शकला नाही. तिसर्‍या चेंडूवर कार्तिकने हार्दिक पांड्याला एक धाव घेऊन स्ट्राइक दिली, पण यादरम्यान तो धावबाद होण्यापासून बचावला.

फिल्डींग थ्रो स्टंपला लागला असता तर डीके आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला असता. चौथ्या चेंडूवर पांड्याने षटकार मारला, पण पुढच्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला, धाव घेण्याची संधी होती, पण पांड्याने धाव घेण्यास नकार दिला. पांड्याने डीकेला स्ट्राइक दिली नाही आणि स्वतः सामना संपवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत त्याने संघाची धावसंख्या 211 धावांवर नेली.

या सामन्यात डीके केवळ २ चेंडूवर एक रन करु शकला.

त्याच्या या कृतीमुळे पांड्या अनेक मीम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. ट्रॉफी जिंकल्यामुळे घमेंडी आली का असा सवाल उपस्थित होत आहे. पांड्या सिनिअरचा आदर करत नाही. असे अनेक आरोप त्याच्यावर करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT