IND vs SA LIVE Score 
क्रीडा

IND vs SA : रविंद्र जडेजाचा पंजा; दक्षिण अफ्रिकेचा 83 धावात उडाला खुर्दा

Kiran Mahanavar

India Vs South Africa LIVE Score World Cup 2023 : भारताच्या 327 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेच्या तगड्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर दैना उडाली. त्यांचा संपूर्ण संघ 83 धावात गारद झाला. भारताने 243 धावांनी विजय मिळवत आपला आठवा सामना खिशात टाकला. रविंद्र जडेजाची फिरकी अन् मोहम्मद शमीच्या स्विंग गोलंदाजीसमोर दक्षिण अफ्रिकेला शतकी मजल मारणे देखील मुश्कील झाले. रविंद्र जडेजाने 5 तर मोहम्मद शामी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. विराट कोहलीने आपले ऐतिहासिक 49 वे वनडे शतक ठोकले. त्याने नाबाद 101 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 77 धावांचे योगदान दिले. रोहित शर्माने सुरूवातीला आक्रमक फलंदाजी करत 40 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 29 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 22 तर शुभमन गिलने 23 धावांचे योगदान दिले.

69-7 (20.3 Ov) : रविंद्र जडेजाने दिला सहावा धक्का 

रविंद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडलं त्याने केशव महाराजचा 7 धावांवर त्रिफळा उडवत आपली चौथी शिकार केली. याचबरोबर आफ्रिकेची अवस्था 7 बाद 69 धावा अशी झाली.

40-5 :अफ्रिकेचा निम्मा संघ गारद 

रविंद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्री क्लासेनला अवघ्या 1 धावेवर बाद करत त्यांना चौथा धक्का दिला होता. त्यानंतर मोहम्मद शामीने रासी वॅन डेर दुसेनला 11 धावांवर बाद करत आफ्रिकेची अवस्था 5 बाद 40 धावा अशी केली.

35-3 : मोहम्मद शामीने दिला तिसरा धक्का 

लोकल बॉय मोहम्मद शामीने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. त्याने एडिन मारक्रमला 9 धावांवर बाद केले.

22-2 : भारताने दिले दोन धक्के

भारताचे 327 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताने दोन धक्के दिले. दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने इन फॉर्म क्विंटन डिकॉकला 5 धावांवर बाद केलं तर रविंद्र जडेजाने कर्णधार टेंबा बाऊमाचा 11 धावांवर त्रिफळा उडवला.

दक्षिण आफ्रिकेसमोर भारतानं ठेवलं 326 धावांचं आव्हान 

विराट कोहलीच्या नाबाद 101 तर रविंद्र जडेजाच्या 15 चेंडूत केलेल्या 29 धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या.

विराट कोहलीचे दमदार शतक

विराट कोहलीने आपले वनडेमधील 49 वे शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या वनडेमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

255-4 (43.3 Ov) : राहुल बाद, आता सूर्याची साथ

श्रेयस अय्यर 77 धावा करून बाद झाल्यानंतर आलेला केएल राहुल 17 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या साथीला सूर्यकुमार यादव आला. या दोघांनी भारताला 250 धावांचा पार पोहचवले.

227-3 : श्रेयस अय्यरने साथ सोडली

श्रेयस अय्यरने विराट कोहली सोबत तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी रचली. मात्र तो 87 चेंडूत 77 धावा करून बाद झाला.

विराट पाठोपाठ श्रेयसचेही अर्धशतक

विराट कोहलीनंतर संथ सुरूवात करणाऱ्या श्रेयस अय्यरने देखील आपले अर्दशतक पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारताला 200 धावांच्या जवळ पोहचले.

166-2 (28.3 Ov) : विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरणाऱ्या विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने संघाला 30 व्या षटकात 170 धावांच्या पार पोहचवले.

109-2 (16.2 Ov) : भारताचे शतक पार 

रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल देखील 24 चेंडूत 23 धावांची भर घालून परतला. गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे हातात घेत संघाला शतक पार नेले.

62-1 (5.5 Ov) : भारताला पहिला धक्का 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने आज धडाकेबाज सुरूवात करत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 चेंडूत 40 धावा चोपल्या. मात्र कगिसो रबाडाने त्याची ही खेळी संपवली अन् भारताला पहिला धक्का दिला.

35-0 (3 Ov) : रोहित - शुभमन गिलची आक्रमक फलंदाजी 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वैर गोलंदाजीचा चांगलाच फायदा उचलला. त्याने फटकेबाजी करत 3 षटकात बिनबाद 35 धावा केल्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

भारताने नाणेफेक जिंकली!

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपली ताकद लक्षात घेता टीम इंडियाला धावांचा पाठलाग करायला आवडेल असे मानले जात होते, पण रोहितने वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे रवी शास्त्री ही आश्चर्यचकित झाले.

रोहित शर्मा म्हणाला की, मला आव्हानाचा सामना करायचा आहे. भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही.

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या जागी वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीचा समावेश केला.

विराट कोहलीसाठी हा खास...! 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना विराट कोहलीसाठी खास आहे. कारण हा सामना त्याच्या ३५व्या वाढदिवसा दिवशी खेळला जात आहे.

अश्विन किंवा शार्दुलला संधी मिळेल का?

भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे एकमेव फलंदाज आहेत ज्यांना संघातून वगळले जाऊ शकते. तो बाहेर गेल्यास रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. दोघेही गोलंदाजीसोबत थोडी फलंदाजीही करू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीत इशान किशनलाही संधी दिली जाऊ शकते. कारण भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जेणेकरून गरज पडल्यास उपांत्य आणि अंतिम सामन्यांपूर्वी तो लयीत राहील.

प्लेइंग-11 मध्ये बदल होणार का?

हार्दिक पंड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता टीम इंडिया आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकते. इशान किशनला संधी मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे. असे झाल्यास सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

Akhilesh Yadav : भाजपकडून माणसे तोडण्याचे काम : खासदार अखिलेश यादव

Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT