भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, मात्र दुखापतीमुळे तो यापुढे मालिकेचा भाग होणार नाही. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.(ind vs sa series fans demand sanju samson)
राहुलशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. यानंतर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. चाहत्यांकडून राहुलऐवजी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संघात आणण्याची मागणी केली जात आहे. एका चाहत्याने लिहिले की, प्रिय बीसीसीआय हीच वेळ आहे जेव्हा दुखापतग्रस्त केएल राहुलऐवजी संजू सॅमसनला संघात आणले जाऊ शकते. ऋषभ पंतचे नेतृत्व सुधारण्यातही तो मदत करू शकतो.
बीसीसीआयने सांगितले की केएल राहुलच्या मांडीला दुखापत झाली आहे. तर कुलदीप यादवला नेट सरावात फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाली आहे. अशा स्थितीत दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंत कर्णधार निवड केली आहे. त्याचबरोबर नुकतेच गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारत : ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, वायने पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वेन डेर डूसेन, मार्को जानसेन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.