India vs South Africa  SAKAL
क्रीडा

Ind vs Sa : दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय खेळाडूंनी डोक्यावर घेतली बॅग अन्... BCCI ने शेअर केला 'तो' व्हिडिओ

Kiran Mahanavar

India vs South Africa : भारतीय क्रिकेट संघ बुधवारी (6 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. दक्षिण आफ्रिकेत भारताच्या आगमनादरम्यान बीसीसीआयने गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

विमानतळ आणि हॉटेलवरही खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. भारताचा पहिला सामना रविवारी (10 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे होणार आहे, जो तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना असेल. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहतेही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन पळताना दिसत आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण यानंतर संघाला जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह संघातील इतर खेळाडूही व्हिडिओमध्ये दिसत होते. यावेळी, व्हिडिओमध्ये एक आश्चर्यकारक दृश्य दिसले, जेव्हा भारतीय खेळाडू पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर बॅग घेतली. आणि बस पकडण्यासाठी धावताना दिसले.

टी-20 मालिकेत रवींद्र जडेजा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. टी20 मालिकेनंतर सूर्यकुमार यादवला विश्रांती मिळेल, जो वनडे वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग होता.

टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (व्हीसी), दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT