India vs Sri Lanka 1st t20 Series sakal
क्रीडा

IND vs SL: टीम इंडियामध्ये तीन सलामीवीर! कर्णधार हार्दिक कुणाला देणार संधी

रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत सलामीवीर कोण?....

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st t20 Series : भारतीय संघ 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीने टी-20 मालिकेत तीन युवा सलामीवीरांना संधी दिली आहे. हे खेळाडू स्फोटक फलंदाजीत माहिर आहेत. आता कर्णधार हार्दिक पांड्या ओपनिंगसाठी कोणाला संधी देतो हे पाहण्यासारखे आहे.

श्रीलंका मालिकेत ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि शुभमन गिल यांना निवड समितीने संधी दिली आहे. हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी यापूर्वी रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत सलामीची जबाबदारी स्वीकारली होती.

इशान किशनने ठोकले शतक

इशान किशनला जेव्हा-जेव्हा टीम इंडियात संधी मिळाली. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 210 धावांची खेळी केली. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची त्याच्यात क्षमता आहे. इशान किशनने त्याच्या कारकिर्दीत एकूण 21 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 29.45 च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत.

शुभमन गिलला पदार्पण करण्याची संधी

शुभमन गिलला अद्याप टी-20 सामन्यांमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही, परंतु हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली त्याचे नशीब उघडू शकते. पण त्याने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने गुजरात टायटन्सला स्वबळावर विजेतेपद मिळवून दिले होते. गिलने भारतासाठी 13 कसोटीत 736 धावा आणि 15 एकदिवसीय सामन्यात 687 धावा केल्या आहेत.

ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवली ताकद...

ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने एका षटकात 7 षटकार मारले होते. त्याने टीम इंडियासाठी 9 टी-20 सामन्यात 135 धावा आणि 1 एकदिवसीय सामन्यात 19 धावा केल्या आहेत. मात्र खराब कामगिरीमुळे तो टीम इंडियात आपले स्थान निश्चित करू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT