IND vs SL 3rd T20 Live 
क्रीडा

IND vs SL 3rd T20: श्रीलंकेविरुद्ध अजय रथ कायम! 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली

Kiran Mahanavar

उमरान मलिकने श्रीलंकेला सहावा धक्का

उमरान मलिकने श्रीलंकेला सहावा धक्का दिला. त्याने वानिंदू हसरंगाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ चेंडूत नऊ धावा करून हसरंगाला दीपक हुडाने झेलबाद केले. श्रीलंकेने 13 षटकांत 6 बाद 107 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

श्रीलंकेचा निम्मा संघ 11.2 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. युझवेंद्र चहलने लंकन संघाला पाचवा धक्का दिला. त्याने धनंजय डी सिल्वाला झेलबाद केले. धनंजयने 14 चेंडूत 22 धावा केल्या. श्रीलंकेने 12 षटकात 5 विकेट गमावत 101 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेची पडली चौथी विकेट

युझवेंद्र चहलने श्रीलंकेला चौथा धक्का दिला आहे. त्याने चरित अस्लंकाला शिवम मावीकरवी झेलबाद केले.

श्रीलंकेची पडली तिसरी विकेट

हार्दिक पांड्याने श्रीलंकेच्या संघाला तिसरा धक्का दिला आहे. त्याने अविष्का फर्नांडोला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केले. 229 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने तीन झटपट विकेट गमावल्या आहेत.

अर्शदीप सिंगने घेतली विकेट

अर्शदीप सिंगने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला आहे. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने पथुम निसांकाला बाद केले.

अक्षरने श्रीलंकेला दिला पहिला धक्का

अक्षर पटेलने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकात कुशल मेंडिसला बाद केले. मेंडिसने 15 चेंडूत 23 धावा केल्या आणि उमरान मलिकने त्याचा झेल घेतला.

श्रीलंकेचा डाव सुरु

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला असता. हार्दिक पांड्याचा चेंडू श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाच्या पॅडला लागला. मैदानावरील अंपायरने त्याला आऊट दिले, पण रिव्ह्यूमध्ये चेंडू विकेटला आदळत नव्हता. निसांका थोडक्यात बचावली.

सूर्यकुमारचे शानदार शतक

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये तिसरे शतक पूर्ण केले आहे. त्याने 45 चेंडूत शतक झळकावले. सूर्याने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध शतके झळकावली होती. टी-20 मध्ये भारताकडून तीन शतके करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माची त्याच्यापेक्षा जास्त शतके आहेत. रोहितने टी-20 मध्ये चार शतके झळकावली आहेत.

हार्दिक पांड्या आउट

भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याची बॅट चालली नाही. चार चेंडूत चार धावा करून तो बाद झाला. कसून राजिताच्या चेंडूवर त्याला धनंजय डी सिल्वाने झेलबाद केले. भारताने 16 षटकात 4 विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत.

शुभमन गिल आउट

भारताला 15 व्या षटकात तिसरा धक्का बसला. शुभमन गिलला वानिंदू हसरंगाने बाद केले. गिल 36 चेंडूत 46 धावा करून क्लीन बोल्ड झाला.

सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत ठोकले अर्धशतक

सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करताना आपल्या टी-20 कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 26 चेंडूत अर्धशतक झळकावले. भारताने 13 षटकात 2 बाद 131 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार 28 चेंडूत नाबाद 58 तर शुभमन गिल 32 चेंडूत नाबाद 34 धावांवर खेळत आहे.

10 षटकांनंतर भारताची धावसंख्या 92/2

भारताने 10 षटकात 2 बाद 92 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली आहे. सूर्यकुमार 15 चेंडूत 25 आणि शुभमन गिल 27 चेंडूत 28 धावांवर नाबाद आहे.

पॉवरप्लेनंतर भारताचा स्कोर 53/2

पॉवरप्ले संपला आहे. भारताने सहा षटकांत दोन गडी बाद 53 धावा केल्या. इशान किशन आणि राहुल त्रिपाठी हे बाद झाले. राहुल त्रिपाठी चांगल्या टचमध्ये दिसत होता, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने 16 चेंडूत 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले.

शुभमन गिल आणि त्रिपाठी यांचे आक्रमक तेवर

इशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक तेवर दाखवले.

चौथ्या चेंडूवर भारताला पहिला धक्का! इशान किशन तंबूत

पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला आहे. पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर दिलशान मदुशंकाने इशान किशनला बाद केले. धनंजय डी सिल्वाने स्लिपमध्ये किशनचा झेल घेतला. त्याला दोन चेंडूत केवळ एक धाव करता आली. भारताने एका षटकात एका विकेटवर सात धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

  • भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

  • श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लांका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.

पांड्याने जिंकले नाणेफेक! संघात कोणताही बदल नाही...

भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने संघात कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने डावखुरा फलंदाज भानुका राजपक्षेला संघातून वगळले आहे. अविष्का फर्नांडोला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

India vs Sri Lanka (IND vs SL) 3rd T20 Live Cricket Score : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. मुंबईतील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. त्याचवेळी पुण्यातील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत पुनरागमन केले. लंकन संघाला राजकोटमधील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT