Asia Cup India vs Sri Lanka 2023 Live Score : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मधील श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. भारताने ठेवलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 172 धाावात गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने देखील 2 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेकडून 20 वर्षाच्या युवा वेल्लालागेने झुंजार खेळी करत नाबाद 42 धावांची खेळी केली. तर धनंजया डि सेल्वाने 41 धावा करून भारताचे टेन्शन वाढवले होते.
तत्पूर्वी, भारताने 16 तासापूर्वीच पाकिस्तानचा 228 धावांची पराभव करत दणक्यात सुपर 4 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. मात्र या दमदार विजयानंतर भारतीय फलंदाजांना श्रीलंकेच्या एका 20 वर्षाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांनी जमिनीवर आणले. भारताचा संपूर्ण डाव 213 धावात संपुष्टात आला.
दुनिथ वेल्लालागेने भारताच्या 5 विकेट्स घेत दिग्गज फलंदाजांना चांगलेच वेसन घातले. त्याने रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या सर्व तगड्या आणि अनुभवी फलंदाजांनी शिकार केली. त्याने 10 षटकात 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
यानंतर पार्ट टाईस स्पिरन चरिथ असलंकाने भारताच्या 4 विकेट्स घेत भारताची अवस्था 9 बाद 189 धावा अशी केली.
श्रीलंकेचा युवा खेळाडू वेल्लालागेने गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही दमदार कामगिरी करत नाबाद 42 धावांची खेळी केली. मात्र अखेर कुलदीप यादवने 4 विकेट्स घेत भारताने सामना जिंकला अन् आशिया कपच्या फायनलमध्ये देखील प्रवेश केला.
रविंद्र जडेजाने दसुन असलंकाला 9 धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला. मात्र त्यानंतर धनंजया डी सेल्वा आणि दुनिथ वेल्लालागेने चांगली भागीदारी रचत लंकेला 31 षटकात 6 बाद 133 धावांपर्यंत मजल मारून दिली.
बुमराह आणि सिराजने लंकेची अवस्था 3 बाद 25 धावा अशी केल्यानंतर चरिथ असलंका आणि सदीरा समरविक्रमा यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले होते. मात्र कुलदीप यादवने समरविक्रमाला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
जसप्रीत बुमराहने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. त्याने कुसल मेंडिसला 15 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. यानंतर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने 18 चेंडूत फक्त 2 धावा करणाऱ्या दिमुथ करूणारत्नेला बाद करत श्रीलंकेची अवस्था 3 बाद 25 धावा अशी केली.
जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात श्रीलंकेच्या पाथुम निसंकाला 6 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.
पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरू झाला. भारताने अखेर 48 व्या षटकात 200 धावांचा टप्पा पार केला. अखेर महीश तिक्षाणाने अक्षर पटेलला 26 धावांवर बाद करत भारताचा डाव शेवटच्या षटकात 213 धावांवर संपवला.
भारताच्या 47 षटकात 9 बाद 197 धावा झाल्या असताना पाऊस आल्याने खेळ थांबवावा लागला.
केएल राहुल बाद झाल्यानंतर असलंकाने आक्रमक झालेल्या इशान किशनची 33 धावांची खेळी संपवली. यानंतर भारताचे चार फलंदाज बाद करणारा वेल्लालागे आपल्या स्पेलचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला. त्याने आपल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिक पांड्याला बाद करत आपला पाचवा बळी टिपला.
वेल्लालागेने भारताची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर केएल राहुल आणि इशान किशन यांनी डाव सावरत चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र 39 धावांवर खेळणाऱ्या राहुलला वेल्लालागने आपल्या 7 व्या षटकात बाद करत चौथी शिकार केली.
दुनिथने भारताला पाठोपाठ तीन धक्के दिल्यानंतर केएल राहुल आणि इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.
टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गिल, कोहली पाठोपाठ कर्णधार रोहितही तंबूत गेला आहे. 91 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. दुनिथ वेलल्गेने रोहितला क्लीन बोल्ड केले. रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
या सामन्यात डुनिथ वेलल्गेने एकहाती टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याने सलग तीन षटकांत भारताच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले.
16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 93/3
फिरकीपटूच्या जाळ्यात टीम इंडिया अडकली आहे. भारताची दुसरी विकेट 19 धावांवर पडली. विराट कोहली 12 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. दुनिथ वेलालगेच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. भारतीय संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतर वेलालगेने सामन्यात श्रीलंकन संघासाठी पुनरागमन केले. रोहित शर्मासोबत इशान किशन क्रीजवर उपस्थित आहे.
रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे अर्धशतक आहे. या डावात त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या.
भारताची पहिली विकेट 60 धावांवर पडली आहे. शुभमन गिल 25 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले. आता विराट कोहली रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने कसून रजिताच्या चेंडूवर षटकार मारून एकदिवसीय क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण केल्या.
सात षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 43 धावा आहे.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत अपडेट आहे. त्याच्यात सुधारणा होत असली तरी तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. डॉक्टरांनी अय्यर यांना हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला. तो टीम इंडियासोबत स्टेडियममध्ये पोहोचला नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा - IND vs SL Asia Cup : सामन्याच्या काही तास आधी टीम इंडियाला मोठा धक्का! BCCI ने दिली मोठी अपडेट
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश तिक्षाना, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, ही खेळपट्टी कालच्या तुलनेत कोरडी दिसत आहे. त्यामुळे भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेलही खेळणार आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.