श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रविंद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय संघात कमबॅक केले. आपल्या कमबॅकच्या सामन्यात जड्डूनं बॅटिंगचा नंबर आल्यावर नाबाद 3 धावा काढल्या. गोलंदाजीवेळी त्याने एक विकेटही घेतली. जाडेजा हा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) जबऱ्या फॅन आहे याची झलत तो संघाबाहेर होता त्यावेळीच पाहायला मिळाली होती. सोशल मीडियावर त्याने 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉगवर अनेक रिलही केले. त्याला चांगली पसंतीही मिळाली. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध विकेट मिळवल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर त्याचा हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. (IND vs SL Ravindra Jadeja celebrates in Pushpa style after taking wicket Watch Video)
कमबॅकच्या सामन्यात रविंद्र जाडेजाने चार षटकांचा कोटा पूर्ण केला. यात त्याने 28 धावा करुन एक विकेट मिळवली. श्रीलंकेच्या डावातील 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चंडीमलला त्याने चकवा दिला. यष्टीमागे ईशान किशनने आपली जबाबादारी पार पाडली आणि रविंद्र जाडेजाच्या खात्यात विकेट जमा झाली. रविंद्र जाडेजाशिवाय युजवेंद्र चहलने एक विकेट घेतली. तर भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी सर्वाधिक 2-2 विकेट मिळवल्या.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला होता. मात्र टॉसवर मॅच जिंकता येत नाही, याची झलक टीम इंडियाने पुन्हा एकदा दाखवून दिली. घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर श्रीलंकेलाही त्यांनी सावधानतेचा इशारा दिलय. लखनऊच्या मैदानात भारतीय संघाने 62 धावांनी विजय नोंदवला.
रविंद्र जाडेजासाठी महत्त्वाचा सामना
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातील (Team India) तो महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. कारण रविंद्र जाडेजा नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही तो मुकला होता. आता तो फिट होऊन परतला आहे. तलावरबाजीनंतर आता तो पुष्पा स्टाईलमध्ये जलवा दाखवताना दिसेल, असे संकेतच त्याने या सामन्यात दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.