Ravindra Jadeja And Rohit Sharma Sakal
क्रीडा

IND vs SL: रोहित तूने क्या किया! नेटकऱ्यांना आठवला द्रविडचा 'कडूपणा'

सकाळ डिजिटल टीम

IND vs SL: सर रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याने मोहालीच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात 175 धावांची खेळी केली. तो कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकवणार असे वाटत असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने डाव घोषीत करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा ( Rohit Sharma) हा निर्णय जाडेजाच्या चाहत्यांना खटकणारा असाच आहे. सोशल मीडियावर यासंबंधीच्या प्रतिक्रियाही उमटताना दिसते. 15 ते 20 मिनिटे दिली असती तर जाडेजाने द्विशतक पूर्ण केले असते, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाने 228 चेंडूत नाबाद 175 धावांची खेळी केली. या दिमाखदार खेळीत त्याने 17 चौकार आणि 3 षटकार खेचले. आपल्या या खेळीत जाडेजाने तिघांसोबत शतकी भागीदारी केल्याचेही पाहायला मिळाले. असा पराक्रम करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. पहिल्यांदा त्याने पंतच्या साथीनं शतकी भागीदारी रचली. त्यानंतर अश्विनच्या साथीन 130 धावा आणि मोहम्मद शमीच्या साथीने त्याने नवव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने डाव घोषित काही क्रिकेट चाहत्यांना राहुल द्रविडच्या कॅप्टन्सीतील निर्णय आठवला. 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात राहुल द्रविडनं सचिन तेंडुलकर 194 धावांवर असताना डाव घोषीत केला होता. या डावात विरेंद्र सेहवागने 309 धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने आपल्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख केला होता. द्रविडने घेतलेला निर्णय हा रणनितीचा एख भाग असला तरी त्यावेळी अनेक चाहत्यांना द्रविडचा हा निर्णय कडूपणा केल्यासारखा वाटला होता. अगदी तिच पुनरावृत्ती जाडेबाबात घडल्याचे काहीजण म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT