Sanju Samson And Rohit Sharma Sakal
क्रीडा

VIDEO : संजू चुकला अन् हिटमॅन पुन्हा बनला अँग्री मॅन!

सुशांत जाधव

IND vs SL Rohit Sharma Angry Reaction On Sanju Samson : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फिल्डवर संजू सॅमसनवर चिडल्याचे पाहायला मिळाले. याआधीही या मालिकेत त्याने भुवीनं कॅच सोडल्यावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. रोहित शर्मा हा कूल आहे. तो कॅप्टन्सी करताना चूक करणाऱ्या सहकाऱ्यांवर विराट राग दाखवत नाही. पण या मालिकेत दुसऱ्यांदा तो संतापल्याचे पाहायसला मिळाले.

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विकेट किपर संजू सॅमसनकडून (sanju samson) चूक झाली. त्यामुळे श्रीलंकेला अवांतर धावा मिळाल्या. यावेळी रोहित शर्मा संजूकडे रागाने बघताना दिसले. संडूच्या चुकीमुळे श्रीलंकेला बायच्या रुपात चौका मिळाला. चौकार गेल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) हातवारे करुन संजूवर वैतागलेला दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

याआधी भारतीय संघाचे नेतृत्व करताना किंवा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर चिडलेले शक्यतो पाहायला मिळत नव्हते. पण पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित थोडा बदललाय का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडू शकतो. याच मालिकेत भुवनेश्वर कुमारवरने कॅच सोडल्यानंतर रोहितने क्रिकेटच्या बॉलला फुटबॉल करत लाथाडल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्या या कृतीवर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. विराट कोहलीच्या बालपणीच्या कोचने रोहितला रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही दिला होता. पण आज पुन्हा तो भडकल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT