Rohit Sharma  esakal
क्रीडा

IND Vs SL : जपून बोलायला हवं; रोहितला असं का म्हणावं लागलं?

सुशांत जाधव

रोहित शर्मा हा आपल्या फलंदाजीशिवाय आपल्या बोलंदाजीनं (बोलण्याने) सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याची ही झलक पुन्हा पाहायला मिळाली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टॉस वेळी तो आधी पटकन बोलून गेला आणि पुन्हा सावरला. मला आता प्रत्येक शब्द जपून वापरायला पाहिजे, असे तो म्हणाला.

त्याच झालं असं की, टॉस झाल्यावर समालोचक मुरली कार्तिकने त्याला संघातील बदलासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, ईशान किशन दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याशिवाय भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि बुमराह देखील मॅच मिस करतील. हे सर्व बोलून झाल्यावर त्याने वाक्य रचनेत सुधारणा केली. या तिघांना विश्रांती देण्यात आल्याचे त्याने सांगितले. मला प्रत्येक गोष्ट जपून बोलायला पाहिजे, असेही तो म्हणाला. तिघांना बसवलेले नाही तर त्यांना विश्रांती दिलीये, हेच त्याला या आपल्या विधानातून सांगायचे होते.

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात दुखापतग्रस्त ईशानशिवाय भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. आवेश खान, रवि बिश्नोई, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्मा हा प्रेस कॉन्फरन्समध्ये मजेदार अंदाजात उत्तरे देताना याआधीही पाहायला मिळाले आहे. तो हलक्या फुलक्या शब्दांनी माहोल फुलवत असतो. सोशल मीडियावर याची चर्चाही रंगते. आता त्याचा हा मुद्दातीही नक्कीच चर्चा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT