India vs Sri Lanka 3rd T20 : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मुंबईत खेळलेला पहिला सामनाही त्याने जिंकला होता. श्रीलंकेचा एकमेव विजय पुण्यात झाला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 112 धावा केल्या.
2022 साली भारतासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना चकित केले. सूर्यकुमार यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक अवघ्या 45 चेंडूत झळकावले. 2022 पासून सुरू असलेला फॉर्म येथेही पाहायला मिळाला आणि सूर्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर पूर्णपणे कहर केला.
सूर्यकुमार यादवने आपल्या डावात एकूण 51 चेंडूत112 धावा केल्या, ज्यात त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 219 होता. ही त्याची टी-20मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार यादवच्या या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात 228 धावा केल्या आणि मोठे लक्ष्य दिले.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. इशान किशन पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर क्रिजवर आलेल्या राहुल त्रिपाठीने झटपट 35 धावा केल्या. त्यामुळे पॉवरप्लेमध्येच दोन गडी गमावूनही भारताला 53 धावा करता आल्या. त्रिपाठी 35 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 111 धावांची भागीदारी केली. गिल 46 धावा करून बाद झाला. हार्दिक आणि दीपक 4-4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.