Lata Mangeshkar Passed Away 
क्रीडा

टीम इंडियाकडून लता दीदींना श्रद्धांजली; काळी फीत बांधून उतरणार मैदानात

भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये पहिला एकदिवसीय सामना आज होत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिग्गज पार्श्वगायिका गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाकडूनही (Team India) लता दीदींना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. रविवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India Vs West Indies) असा पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे, यावेळी ही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. (Ind vs WI 1st ODI team india wear sport black armbands to condole demise of Lata Mangeshkar)

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया आपल्या दंडावर काळ्या रंगाचा स्पोर्ट्स बँड (Sports ArmBand) लावून लता दादींना श्रद्धांजली वाहणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी ही माहिती दिली. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. यावेळी राष्ट्रध्वजही अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.

लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी आज (६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या यातून बऱ्या झाल्या पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृतीत चढ-उतार सुरु होता. दरम्यान, त्यांच्यावर उपाचर करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितलं की, कोविडनंतर २८ दिवसांहूनही अधिक काळ रुग्णालयात राहिल्यानंतर मल्टिऑर्गन फेल्युअरमुळं त्यांचं निधन झालं.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. त्यानंतर वयाच्या १३ व्या वर्षी सन १९४२ मध्ये त्यांनी आपल्या गायनाच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर ७० वर्षांच्या त्यांच्या गायकिच्या करियरमध्ये त्यांनी विविध भाषांमध्ये सर्व प्रकारच्या मुडमधील हजारो गाणी गायिली. ३६ हून अधिक प्रादेशिक भाषा आणि परदेशी भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांना सन २००१ मध्ये भारतरत्न या किताबानं गौरविण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT