WI vs IND 1st T20 Hardik Pandya : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8.00 वाजता पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतमोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना आशिया चषक आणि 2023 विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे.
उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळू शकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याचे सर्वात घातक शस्त्र ठरतील. पण पांड्यासमोर मोठा पेच म्हणजे, संघात चार फिरकीपटू आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. युझवेंद्र व बिश्नोई हे लेगस्पिनर असून कुलदीप व अक्षर हे डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. अक्षर याला अष्टपैलू खेळाडू म्हणून पसंती देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी करणारा तिलक वर्मा हा मधल्या फळीतील फलंदाज व कामचलाऊ गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आला आहे.
भारताचा टी-20 संघ - इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 मालिका
पहिला T20 सामना, 3 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, त्रिनिदाद
दुसरा T20 सामना, 6 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, गयाना
तिसरा T20 सामना, 8 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, गयाना
चौथा T20 सामना, 12 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, फ्लोरिडा
पाचवा T20 सामना, 13 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, फ्लोरिडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.