Ind vs Wi 1st Test Ajinkya Rahane : 
क्रीडा

Wi vs Ind : 'उपकर्णधार झाल्यानंतरही संघात तुझी जागा निश्चित नाही...' रहाणेला माजी सलामीवीराचा तिखट टोला

Kiran Mahanavar

Ind vs Wi 1st Test Ajinkya Rahane : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून खेळल्या जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियात मोठे बदल झाले.

चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे, तर अजिंक्य रहाणेला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी उत्कृष्ट देशांतर्गत हंगाम आणि उत्कृष्ट कामगिरीनंतर WTC फायनलमध्ये रहाणे 17 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये परतला.

WTC फायनलमध्ये टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर त्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि कॅरेबियन दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले. तथापि टीम इंडियाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा मानतो की, रहाणेला उपकर्णधार बनवण्यात आले असले तरी त्याचे संघातील स्थान निश्चित झालेले नाही. 34 वर्षीय फलंदाज उपकर्णधार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जर त्याने धावा केल्या नाहीत तर त्याला संघातून वगळले जाऊ शकते.

उपकर्णधार असण्याचा अर्थ तिच्या जागा सुरक्षित आहे असे नाही

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, “अजिंक्य रहाणे ही एक मनोरंजक कथा आहे. तो 18 महिने संघाबाहेर होता आणि अचानक तू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये चांगली कामगिरी केली आणि तो संघाचा उपकर्णधार झाला. पण याचा अर्थ त्याची जागा सुरक्षित आहे का?"

जर धावा केल्या तर तुम्ही जागा...

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'नाही, कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हाही तो उपकर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटीत त्याला वगळण्यात आले होते. त्यामुळेच त्याचे स्थान निश्चित झाले आहे असे मला वाटत नाही. मला वाटते की त्याला धावा कराव्याच लागतील. जर त्याने धावा केल्या तर तो आपले स्थान टिकवून ठेवू शकेल, अन्यथा उपकर्णधारपदाचा टॅग फारसे काही करू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: राज्यभरात मतदान केंद्रांची तोडफोड, कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; जाणून घ्या कुठे काय घडलं?

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election Voting 2024: मतदान अधिकारी म्हणाला, कमळाचे बटण दाबा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

SCROLL FOR NEXT