IND VS WI  SAKAL
क्रीडा

IND VS WI - विश्वकरंडकाची तयारी आजपासून

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका; संघ निवडीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : काही महिन्यांवर आलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची तयारी भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेद्वारे करणार आहे. संघाचा समतोल आणि खेळाडूंची निवड याकडे अधिक लक्ष दिले जाईल; परंतु गेले अनेक सामने अपयशी ठरत असलेला विराट कोहली या मालिकेत तरी यशस्वी ठरणार का, याचीही उत्सुकता असेल.

या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर या दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्‍वकरंडक खेळवण्यात येणार आहे. अमिरातीतील टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेप्रमाणे भारताची सलामीची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

के. एल. राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांनी दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेमधून माघार घेतली आहे. राहुलच्या दुखापतीमुळे टी-२० मालिकेत रोहितसोबत सलामीला कोण खेळेल, हा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे.

इशान किशन व ॠतुराज गायकवाड हे दोन पर्याय समोर आहेत. इशान किशनला संधी दिल्यास तो यष्टिरक्षणाचीही जबाबदारी पार पाडू शकतो. तसेच यामुळे रिषभ पंतलाही विश्रांती देता येऊ शकते. भारतीय संघासमोर पुढील दौऱ्यात श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. त्यामुळे व्यस्त वेळापत्रकातून खेळाडू फिट राहणे गरजेचे असणार आहे.

कुलदीप-चहल एकत्र खेळणार?

वॉशिंग्टन सुंदर याने दुखापतीमुळे टी-२० मालिकेमधून माघार घेतली. त्याच्याऐवजी संघामध्ये अंतिम क्षणी चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याची निवड करण्यात आली. कुलदीप व युझवेंद्र यांनी संघासाठी एकत्रितपणे खेळताना दमदार विजय मिळवून दिले आहेत. मात्र कुलदीपच्या सुमार फॉर्ममुळे गेल्या काही काळात दोघेही एकत्रितपणे खेळू शकले नाहीत; पण आता दोघांनाही पुन्हा एकत्र खेळता येऊ शकणार आहे. अर्थात संघ व्यवस्थापनाने त्यांची निवड करायला हवी. युवा लेगस्पिनर रवी बिश्‍नोई हाही संधीच्या प्रतिक्षेत आहे. भविष्याचा विचार करता बिश्नोईला या सामन्यात प्राधान्य मिळू शकते.

मधल्या फळीत संधी कोणाला?

मधल्या फळीत कोणाकोणाला खेळवायचे, हाही प्रश्‍न या वेळी संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे. व्यंकटेश अय्यर या अष्टपैलू खेळाडूला सहाव्या स्थानावर संधी देण्यात आल्यास श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकालाच अंतिम अकरामध्ये संधी मिळेल. पंतला विश्रांती देण्यात आल्यास श्रेयस व सूर्यकुमार हे दोन्हीही अंतिम अकरामध्ये खेळू शकतील.

अष्टपैलू खेळांडूंमध्ये चुरस

शार्दूल ठाकूर, दीपक चहर व हर्षल पटेल या अष्टपैलू खेळाडूंमध्येही अंतिम अकरामध्ये प्रवेश करण्यासाठी चुरस असणार आहे. या तीनपैकी दोनच अष्टपैलू खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. दीपक व शार्दूल हे दोन्ही चेंडूला स्विंग करणारे गोलंदाज असून दोघांनीही गेल्या काळामध्ये आपल्या आपल्या फलंदाजीत कमालीची सुधारणा केली आहे. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू एकाच धाटणीचे असल्यामुळे दोघांपैकी एकालाच संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT