Shubman Gill IND vs ZIM 3rd ODI : शुभमन गिलने झिम्बाब्वे मालिकेत चांगली कामगिरी सुरूच ठेवली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले आहे. जानेवारी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शुभमन गिल अनेक वेळा 90 पर्यंत पोहोचला होता परंतु शतक झळकावू शकला नाही. (shubman gill first century of international cricket)
22 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिलने वनडे कारकिर्दीत शानदार पदार्पण केले आहे. तो केवळ 9 वा सामना खेळत आहे. एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तो 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वात मोठी 268 धावांची खेळी खेळली. आता 2022 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
शुभमन गिल याआधी वेस्ट इंडिजमध्ये 3 वनडे खेळला होता. यादरम्यान त्याने 64, 43 आणि नाबाद 98 धावा केल्या होत्या. पावसामुळे त्याला शतकही करता आले नाही. सध्याच्या मालिकेत त्याने नाबाद 82, 33 आणि नाबाद 130 धावा केल्या आहेत. म्हणजेच गेल्या 6 डावांवर नजर टाकली तर प्रत्येक वेळी त्याने 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शुभमन गिलने हरारे येथे भारतासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्याही केली. त्याने अंबाती रायडूचा 124 धावांचा विक्रम मोडला आहे. हरारे येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. या यादीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंचाही समावेश आहे.
शुभमन गिलला अजून टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचे आहे. त्याने एकूण 89 टी-20 सामन्यांमध्ये 2317 धावा केल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये तो चॅम्पियन टीम गुजरात टायटन्सचा भाग होता आणि त्याने 400 हून अधिक धावा केल्या होत्या. त्याने प्रथम श्रेणीच्या 35 सामन्यांत 2877 धावा केल्या आहेत. त्याने 7 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. लिस्ट-ए कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यापूर्वी त्याने 63 सामन्यात 49 च्या सरासरीने 2633 धावा केल्या होत्या. त्यात 6 शतके आणि 14 अर्धशतके होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.