Smriti Mandhana 
क्रीडा

IND W Vs AUS W: स्मृतीच्या बॅकफूट पंचमधील 'दादागिरी'; व्हिडिओ एकदा बघाच

स्मृतीने शफाली वर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.

सुशांत जाधव

IND W Vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट टीम (India Women's National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम (Australia Women Cricket Team) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने जबरदस्त कमबॅक केले. गेल्या काही सामन्यांत मोठी खेळ करण्यात अपयशी ठरत असलेल्या स्मृतीने ग्रेट बॅरियर रीफ एरिना (Great Barrier Reef Arena), मॅके (Mackay) स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन महिला गोलंदाजीचा धुव्वा उडवला.

भारतीय संघाच्या डावातील आठव्या षटकात स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) डार्सी ब्राउन (Darcie Brown) च्या एका षटकात सलग तीन चौकार लगावले. पहिल्या सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृतीच्या धमाकेदार खेळीनं त्यांचा हा निर्णय फोल ठरला. स्मृतीने शफाली वर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. ती ऑस्ट्रेलियाच्या मैदानात शतकाला गवसणी घालेल, असे वाटत होते. पण 94 चेंडूत 86 धावावर तिच्या खेळीला ब्रेक लागला.

दुसऱ्या वनडे सामन्यातील 18 व्या षटका स्मृतीने वनडे कारकिर्दीतील 19 वे अर्धशतक पूर्ण केले. डार्सी ब्राउनच्या गोलंदाजीवर मारलेल्या तीन षटकारानंतरच ट्विटरवर स्मृती मानधना ट्रेंडिगमध्ये दिसत होती. स्मृती मानधना पुन्हा एकदा आपल्या जुन्या तोऱ्यात फलंदाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. काही क्रिकेट चाहत्यांना तिने मारलेल्या फटकेबाजीवेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही आठवण झाली.

एका नेटकऱ्याने स्मृती अगदी गांगुलीप्रमाणे संयमी खेळी करताना दिसते, असे मत व्यक्त केले. तिने जे सलग चौकार खेचले त्यात अगदी गांगुलीची झलकच पाहायला मिळीली. स्मृती मानधना गांगुलीप्रमाणे बॅकफूटवर खूपच मजबूत फलंदाजी करते.

स्मृती मानधनाने केलेली 86 धावांची खेळी आणि रिचा घोष हिने 50 चेंडूत केलेल्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित 50 षटकात 7 बाद 274 धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिलांनी 4 विकेट स्वस्तात गमावल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT