india 5 match t20 series south africa announced 16 member team anrich nortje SAKAL
क्रीडा

IND vs SA : भारताच्या दौऱ्यासाठी आफ्रिका संघाची घोषणा 'या' दिग्गजाचे पुनरागमन

आयपीएलनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाला सुरु होणार आहे.

Kiran Mahanavar

आयपीएलनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाला सुरु होणार आहे. जूनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये T-20 मालिकेचा थरार चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यात पाच T-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. भारतविरुद्व मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने त्याचा T-20 संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांचा सर्वात वेगवान गोलंदाज संघात परतला आहे.(India 5 Match T20 Series South Africa)

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ जूनमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यात पाच T-20 सामन्यांची मालिका आयोजित केली आहे. या वर्षी T-20 विश्वचषक देखील होत आहे, त्यामुळे चाहत्यांची नजर पुढील प्रत्येक T-20 आंतरराष्ट्रीय मालिकेवर असतील. क्रिकेट दक्षिण आफ्रिकने भारताविरुद्धच्या या T-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. 9 जून ते 19 जून या कालावधीत पाच सामन्यांची T-20 मालिका खेळली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत T-20 स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा ट्रिस्टन स्टब्सचा या दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.याशिवाय संघात जवळपास 7 महिन्यांनंतर जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या एनरिच नॉर्खियाही पुनरागमन करत आहे. गेल्या वर्षी T-20 विश्वचषकात शेवटचा दिसलेला एनरिच नॉर्खिया आता पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे.

  • भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आफ्रिकन संघ

    तेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्क्रम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, मार्को येनसेन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि रासी वेन डर डुसेन.

  • पहिला T20 सामना, 9 जून, दिल्ली

  • दुसरा T20 सामना, 12 जून, कटक

  • तिसरा T20 सामना, 14 जून, विशाखापट्टणम

  • चौथा T20 सामना, 17 जून, राजकोट

  • पाचवा T20 सामना, 19 जून, बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT