india a vs pakistan emerging asia cup 2023 SAKAL
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup: आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान आमने-सामने, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहा सामना

सर्वात उत्कंठा असलेली भारत-पाकिस्तान लढत आज

Kiran Mahanavar

India a vs Pakistan Emerging Asia Cup 2023 : आशिया करंडक इमर्जिंग क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि त्यातील सर्वात उत्कंठा असलेली भारत-पाकिस्तान लढत आज होत आहे. अ गटात समावेश असलेल्या या दोन संघांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे. कदाचित अंतिम सामन्यात पुन्हा सामना होऊ शकतो; मात्र त्याअगोदर एकमेकांना आजवण्याची संधी आजच्या सामन्यातून मिळणार आहे.

भारतीय संघात कसलेले खेळाडू आहेत. यश धुल कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदही मिळवलेले आहे. त्याच्या साथीला ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा असे फलंदाज आहेत. या सर्वांकडे आयपीएलचाही अनुभव आहे. त्यामुळे त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे.

गोलंदाजीत राजवर्धन हंगरगेकरवर वेगवान गोलंदाजीची मदार आहे. तोही १९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघाचा खेळाडू आहे. त्यामुळे पाकविरुद्धच्या या सामन्यात भारताचे पारडे जड आहे.

भारताने पहिल्या दोन साखळी सामन्यात अमिरातीचा आठ विकेटने; तर नेपाळचा नऊ विकेटने पराभव केलेला आहे; तर पाकने नेपाळवर चार विकेटने आणि अमिरातीवर १८४ धावांनी मात केलेली आहे.

भारत विरुद्ध पाक

  • ठिकाण : कोलंबो, वेळ : दुपारी २ पासून

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस नेटवर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT