India A vs Pakistan A  ESAKAL
क्रीडा

India A vs Pakistan A : आधी नो बॉलवर विकेट नंतर एज नसतानाही बाद... पाकिस्तानने केलंय फिक्सिंग?

अनिरुद्ध संकपाळ

India A vs Pakistan A : भारत अ आणि पाकिस्तान अ संघात सुरू असलेल्या इमर्जिंग टीम आशिया कप 2023 च्या फायनल सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडीने देखील दमदार सुरूवात करत 64 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताला दोन धक्के बसले. (Umpire)

सलामीवीर साई सुदर्शन 29 धावांवर अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर मोहम्मद हारिसकडे झेल देऊन बाद झाला. तर निकिन जोसला मोहम्मद वसिम ज्युनियरने मोहम्मद हारिकरवीच 11 धावांवर झेलबाद केले. मात्र या दोन्ही विकेट्सवरून सोशल मीडियावर वादंग निर्माण झाले आहे. नेटकऱ्यांनी पाकिस्तानला थेट फिक्सर ठरवले आहे. (Pakistan Match Fixing Allegation)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्माने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताला 18 षटकात 120 धावांचा पार पोहचवले आहे. साई सुदर्शन आणि जॉस बाद झाल्यानंतर संघाचा कर्णधार यश धूल अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी क्रीजवर आला आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने याचा फायदा उचलत 50 षटकात 8 बाद 352 धावा केल्या. पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज तय्यब ताहिरने 71 चेंडूत 108 धावांची शतकी खेळी केली. तर सलामीवीर सैम आयुब (59) आणि साहिबजादा फरहानने (65) 121 धावांची सलामी दिली होती. भारताकडून हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT