India and New Zealand 1st T20I Rain May Spoil The Game : टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्यानंतर भारतीय टी 20 संघात मोठे बदल करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभुमीवर न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली भारताची युवा टी 20 टीम आजपासून तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. संघातील युवा खेळाडूंसह भविष्यातील टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतोय हे पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र पहिल्याच टी 20 सामन्यावर वरूणराजाने वक्रदृष्टी टाकल्याने सामन्यावरच बालट आले आहे.
अॅक्यूवेदर नुसार वेलिंग्टनमध्ये आज 81 टक्के पावसाची शक्यता आहे. वेलिंग्टनमध्ये पावसाच्या सरी साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळानुसार सकाळी 11.30) कोसळण्याची शक्यता आहे. सामना हा भारतीय वेळेनुसार 12 वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या सुरूवातीलाच पाऊस पडणार असल्याने सामना होणार की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात सांशकता आहे. मात्र 12 नंतर पावसाची शक्यता कमी कमी होत जाणार आहे. मात्र तरी देखील पाऊस पडण्याची शक्यता 49 टक्के इतकी राहणारच आहे.
टी 20 वर्ल्डकपमध्ये पावसामुळे अनेक सामने वाहून गेले होते. आता न्यूझीलंडमध्येही सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. दरम्यान, वेलिंग्टनमध्ये जरी पावसाची शक्यता वर्तवली असली तरी वेलिंग्टनमधील ग्राऊंडची ड्रेनेज सिस्टम चांगली असल्याने ओल्या मैदानामुळे सामना रद्द होण्याची शक्यता फार कमी आहे. ही चाहत्यांच्या दृष्टीने दिलासादायक गोष्ट आहे.
भारताची संभाव्य Playing 11
शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर / दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.