India announce ODI and T20 team for upcoming west indies series selector showing trust on wrist spinner  esakal
क्रीडा

आता मोर्चा रिस्ट स्पिनरकडे; कुलदीपचे कमबॅक, बिश्नोईला संधी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजविरुद्धच्या (India vs West Indies) एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघावर रिस्ट स्पिनरची (Wrist Spinner) छाप आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत भारतीय फिरकीपटूंना मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात आलेले अपयश पाहता. निवडसमितीने नव्या दमाच्या आणि मनगटी फिरकीपटूंवर जास्त विश्वास दर्शवला आहे. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) संघात पुनरागमन केले आहे. (India announce ODI and T20 team for upcoming west indies series selector showing trust on wrist spinner)

भारतीय एकदिवसीय संघात यझुवेंद्र चहल (yuzvendra chahal), कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या मनगटी फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या जोडीला दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश या संघात आहे. दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन अष्टपैलू खेळाडू देखील संघात आहेत.

रवी बिश्नोईने पंजाब किंग्ज (PBKS) संघाकडून खेळाता आयपीएलमध्ये (IPL) 23 सामन्यांत 24 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी 6.96 इतकी आहे. फलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल हे सलामीचे फलंदाज असताना त्याला संधी मिळेल का हाही प्रश्न आहे.

भारत एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

भारताचा टी२० संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, हर्षल पटेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT