PV Sindhu Paris Olympic esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 : PV Sindhu चे ऑलिम्पिक आव्हान संपुष्टात! भारतासाठी धक्कादायक निकाल

Paris Olympic 2024 PV Sindhu dream over - तिसऱ्या ऑलिम्पिक पदकाच्या निर्धाराने खेळणाऱ्या भारताच्या पी व्ही सिंधूला चिनी भिंत ओलांडता आली नाही.

Swadesh Ghanekar

PV Sindhu in Paris Olympic 2024 : पी. व्ही. सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि २०२०च्या टोकियोत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. यावेळी पॅरिसमध्ये तिसऱ्या पदकाच्या निर्धाराने भारताची दिग्गज कोर्टवर उतरली. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पी व्ही सिंधूने चिनी खेळाडू बिंग जिआओ हे हिला झुंजवले. पण, ती पराभव टाळू शकली नाही. सिंधूचे तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

पी व्ही सिंधू आणि चीनची बिंग जिआओ हे यांच्यात नेहमीच कडवी टक्कर पाहायला मिळाली आहे. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये सिंधू ९-११ अशी पिछाडीवर आहे, परंतु मागील ३ सामन्यांत सिंधूने दोनवेळा बिंगला पराभूत केले आहे. त्यामुळे तिसऱ्या ऑलिम्पिक पदकासाठी प्रयत्नशील असलेल्या सिंधूकडून विजयाची आस लावून चाहते बसले होते. सहाव्या मानांकित बिंग हे हिने ९-५ अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चिनी खेळाडूने नेट जवळ जोरकस फटके मारून सिंधूला कोर्टवर खेळवले आणि ११-९ अशी आघाडी कायम ठेवली.

कमी उंची असलेली बिंग हे स्मॅश फटके खेचून सिंधूला कोर्टजवळून खेळण्यास भाग पाडत होती. उंची जास्त असल्याने सिंधूला खाली येणारा कॉक त्वरित परत पाठवण्यात अडचण येत होती. तरीही सिंधूने मॅच चुरशीची केली आणि गेम १२-१२ असा बरोबरीत आणला. पण, बिंग हे हिने नेट जवळ चतुराईचा खेळ करून सिंधूला चुका करण्यास भाग पाडून १६-१४ अशी आघाडी मिळवली. १५-१८ अशा पिछाडीनंतर सिंधूने दोन सलग गुण घेतले आणि अविश्वसनीय पुनरागमन करून १९-१९ अशा बरोबरीवर गेम आणला. तिचा स्मॅश चिनी खेळाडूला कोर्टवर लोटांगण घालणारा ठरला. दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त रॅली रंगली, परंतु चिनी खेळाडूने पहिला गेम २१-१९ असा जिंकला.

पिछाडीनंतर सिंधू खरेच असे चिनी खेळाडूला वाटले, परंतु भारतीय स्टार जबरदस्त खेळली. मात्र चिनी खेळाडूने २१-१४ असा विजय मिळवून सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या गेममध्ये सिंधूने काही आश्चर्यचकित करणारे फटके खेचून प्रतिस्पर्धीला काही काळासाठी बॅकफूटवर फेकलेले, परंतु २६ मिनिटांच्या या गेममध्ये चिनी खेळाडू वरचढ ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

High Court : ... तर तरुणाईचे आयुष्य होणार उद्ध्वस्त, उच्च न्यायालय : तस्करीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT