manu bhaker qualify for medal round  sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live : भारतासाठी आनंदाची बातमी! नेमबाज Manu Bhaker ची फायनलमध्ये धडक

Paris Olympic 2024 India - नेमबाजीच्या दोन वेगवेगळ्या गटांत थोडक्यात अपयश आल्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल विभागात महिला नेमबाज मनू भाकर कमाल केली.

Swadesh Ghanekar

Paris Olympics 2024 Live India - पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतीयांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. नेमबाजीच्या दोन वेगवेगळ्या गटांत थोडक्यात अपयश आल्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल विभागात महिला नेमबाज मनू भाकर ( Manu Bhaker) हिने पदकाच्या शर्यतीत स्थान पक्के केले. उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता फायनल होणार आहे आणि २२ वर्षीय नेमबाजपटूकडून भारताला पदकाची भरपूर अपेक्षा आहे.

नेमबाजीत मिश्र गटाच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत भारताच्या रमिता व अर्जुन बबुता यांना १ गुणाच्या फरकाने पदक शर्यतीतून बाद व्हावे लागले. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तुल पुरुष गटात सरबजोत सिंगला ( Sarabjot Singh) यालाही समान ५७७ गुण असूनही थोडक्यासाठी माघारी फिरावे लागले. आठव्या स्थानासाठी सरबजोत व रॉबिन वॉल्टर यांच्या ५७७ गुणांसह टाय झाली होती. पण, वॉल्टरने ( १८) सरबजोतपेक्षा ( १७) एक लक्ष्य १० गुणांच्या बरोबर मधोमध भेदले आणि त्या जोरावर त्याने आठव्या क्रमांकासह पदकाच्या शर्यतीत झेप घेतली. सरबजोतला नवव्या क्रमांकावर रहावे लागले.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात मनू भाकर व रिदीम सांगवान यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. या दोघींनी पहिल्या सीरिजमध्ये समान ९७ गुण कमावले, परंतु मनू चौथ्या व रिदीम ८व्या स्थानावर होत्या. दुसऱ्या सीरिजमध्ये मूनने पहिल्या तीन प्रयत्नांत परफेक्ट १० गुण घेत जबरदस्त पुनरागमन केले. तिसऱ्या सीरिजनंतर मनू चौथ्या क्रमांकावर होती, परंतु पुढच्या सीरिजमध्ये तिची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली. रिदम १९व्या क्रमांकावर गेली होती.

मनूने पाचव्या सीरिजमध्ये कमबॅक करताना एक स्थान वर झेप घेतली. सहाव्या सीरिजमध्ये पहिल्या ५ प्रयत्नांमध्ये ९,१०,१०,१०,९ असा निशाणा साधताना टॉप थ्रीमध्ये प्रवेश केला. दक्षिण कोरियाची १९ वर्षीय नेमबाज ओह ये जिन हिने सर्वाधिक ५८२ गुण घेताना दुसऱ्या स्थानावरील पकड घट्ट केली होती. मनूने ५८० गुणांसह तिसरे स्थान पक्के केले व फायनलमध्ये प्रवेश केला.

Manu Bhaker qualifies for the final of the women's 10m air pistol

मनू भाकरने २०१८ च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दोन सुवर्ण पदके जिंकली. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT