narendramodi call manu bhaker sakal
क्रीडा

India at Paris olympics 2024 Live Update - Manu Bhaker ला पंतप्रधान मोदींचा फोन! कौतुक केलं अन् मग विचारलं...

Swadesh Ghanekar

India at Paris olympics 2024 Live : भारताच्या मनू भाकरने ( Manu Bhaker) रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले आणि तिच्या या कामगिरीसह भारताने पॅरिसमध्ये आपले खाते उघडले. यापूर्वी, अभिनव बिंद्रा राज्यवर्धन राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग यांनी नेमबाजीत भारताला ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहेत.

मनूच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वांकडून तिचे कौतुक केले जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी ट्विट करून आणि नंतर कॉल करून मनूचे कौतुक केले. दरम्यान, पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने JioCinema शी बोलताना म्हटले, “मी भगवत गीता खूप वाचली आहे. तुला जे करायचं आहे ते कर, हेच माझ्या मनात चाललं होतं. प्रयत्न करणे तुमच्या हातात आहे, नशिबात काय आहे, हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात, "कर्म कर, फळाचा विचार करू नको" हेच डोक्यात चालू होतं. मला वाटते, ' तुम्ही तुमचे काम करा आणि सर्वकाही होऊ द्या.''

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ऐतिहासिक पदक... पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक जिकंल्याबद्दल तुझे अभिनंदन... कांस्यपदकासाठी तुझं कौतुक.. हे यश आणखी खास होतं, कारण ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी तू पहिली भारतीय महिला आहेस. अविश्वसनीय यश!

या यशानंतर मोदींनी नंतर मनूला कॉल केला... ''तुझ्या यशामुळे माझ्या आनंदात भर पडली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रायफलने तुला दगा दिला, परंतु यावेळी तू सर्व उणीव भरून काढलीस. पुढील सामन्यांत तू आणखी चांगली कामगिरी करशील आणि याने तुझा आत्मविश्वास वाढेल. याचा देशालाही लाभ होईल,'' असे ते म्हणाले.

त्यानंतर त्यांनी मनूला विचारले की, खेळाडूंची पॅरिसमध्ये व्यवस्थित सोय केली गेली आहे ना? आपल्या खेळाडूंना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी आम्ही पण प्रयत्न केले... खेळाच्या दृष्टीने जो कन्फर्ट हवा असतो, तो देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडून तुला खूप खूप आशीर्वाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Mumbai Accident: कल्याण-पत्री पुलावर 106 चाकांचा ट्रेलर उलटला; डोंबिवलीहून कल्याणला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

Jitendra Awhad: अक्षय शिंदेची जी हत्या झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...; आव्हाडांकडून ऑडिओ क्लिप ट्विट

Chandrapur : विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा...व्याहाड शाळेतील शिक्षिकेच्या पाणी बाँटलमध्ये दारू टाकल्याचा संशय

Latest Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज पुण्यात तर शरद पवार गटाचे समरजीत घाडगे मुंबईत घेणार मेळावे

SCROLL FOR NEXT