Rohit Sharma Ruled Out First Test Against Bangladesh : बांगलादेशविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय कसोटी संघात बदल केले आहेत. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे, त्याच्या जागी केएल राहुलकडे कसोटी मालिकेची कमान सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी भारत-अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ईश्वरन सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेश-अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात तो भारत-अ चे नेतृत्व करत होता. बांगलादेश-अ विरुद्धच्या मालिकेत ईश्वरनने बॅक-टू-बॅक सेंच्युरी झळकावली. बांगलादेश 'अ' संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ईश्वरनने 141 धावा केल्या. त्याचवेळी दुसऱ्या कसोटीत त्याने 157 धावा केल्या.
यासोबतच बीसीसीआयने आणखी एक मोठा अपडेट दिला आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार शमी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या जागी जयदेव उनाडकट तर जडेजाच्या जागी डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या वनडेत रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यांनी मुंबईत एका तज्ज्ञाची भेट घेतली. दुखापतीमुळे त्याला विश्रांती आणि निरीक्षणाचा सल्ला देण्यात आला आहे. रोहित बदली म्हणून संघात आला असूनही ईश्वरनला बेंचवर बसावे लागेल. केएल राहुल आणि शुबमन गिल पहिल्या कसोटीत ओपनिंग करताना दिसतील.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव , शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.