India Vs Netherlands T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने सुपर 12 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले. यापूर्वी आजच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 104 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांचा हा आनंद भारताने क्षणिक ठरवला.
भारताकडून विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी (62) खेळी केली. तर सूर्यकुमार यादव (51) आणि रोहित शर्माने देखील (53) धावांचे योगदान दिले. भारताने 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडने 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारताने विजयासाठी ठेवलेले 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडला तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला. त्याने विक्रमजीत सिंगला 1 धावेवर बाद केले.
पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात अक्षर पटेलने मॅक्स ओडोडचा 16 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले. अक्षर पटेलने बास दे लीड्सला 16 धावांवर बाद करत नेदरलँडला तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलपाठोपाठ भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने देखील नेदरलँडला धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने कॉलिन अॅकेरमन आणि टॉम कूपर यांना एकाच षटकात माघारी धाडले.
अश्विन पाठोपाठ मोहम्मद शमीने टिम प्रिंगलला बाद करत शंभरच्या आत नेदलँडला सहावा धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वरने एडवर्डला 5 धावांवर बाद करत नेदरलँडचा सातवा आणि वैयक्तिक दुसरा बळी टिपला. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरनंतर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील विकेट्सचे खाते उघडले. त्याने लोन वॅन बीकला 3 तर फ्रिड क्लासेनला शुन्यावर बाद करत नेदरलँडचा 9 वा फलंदाज माघारी पाठवला. अखेर नेदरलँडच्या शेवटच्या जोडीने ऑल आऊट न देता संघाला 123 धावांपर्यंत पोहचवले.
तत्पूर्वी, भारताने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. भारताची रन मशिन पुन्हा एकदा भरात आली असून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र सलामीवीर केएल राहुलला नेदलँडविरूद्ध देखील मोठी खेळी करण्यात अपयश आहे. तो 9 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावांची तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.