India first Olympic team Participation sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : 'टाटां'चा पुढाकार, ८००० रुपयांची मदत अन् टीम इंडियाची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Paris Olympic 2024 : पुण्याचे कुमार नवले आणि कोल्हापूरचे दिनकरराव शिंदे यांनी कुस्तीत भारताचे सर्वप्रथम प्रतिनिधित्व केले

सकाळ डिजिटल टीम

India first Olympic team 1920 Summer Olympics - पुण्याच्या डेक्कन जिमखान्यात १९१९ ला क्रीडा महोत्सव आयोजित केले गेले होते... सर दोराब्जी टाटा ( Sir Dorabji Tata) यांच्या मनात आलं की भारतानं १९२०च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायला हवा... त्यांनी बॉम्बेचे तत्कालिन राज्यपाल लॉयड जॉर्ज ( Lloyd George) यांना ही कल्पना सांगितली... त्यानंतर टाटांनी आर्थिक मदतही केली आणि भारताचा पहिला अधिकृत संघ ऑलिम्पिकमध्ये दाखल झाला...

भारताने १९०० मध्ये सर्वात प्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. नॉर्मन पिचर्ड यांनी त्या स्पर्धेत २०० मीटर धावण्याची स्पर्धा आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत असे दोन रौप्यपदक जिंकली होती आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते आशियाई देशाचे पहिले खेळाडू ठरले होते. पण, त्यानंतर दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सहभाग घेता आला नव्हता. Indian Olympic Journey

भारतीयांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा अशी इच्छा सर दोराब्जी टाटा यांना वाटत होती आणि १९१९मध्ये त्यांनी ती बॉम्बेचे राज्यपाल लॉयड जॉर्ज यांच्याकडे व्यक्त केली. डेक्कन जिमखान्यात क्रीडा महोत्सवा दरम्यान टाटा आणि जॉर्ज यांची भेट झाली. टाटा तेव्हा डेक्कन जिमखान्याचे अध्यक्ष होते आणि जॉर्ज प्रमुख अतिथी म्हणून आले होते. ब्रिटीश ऑलिम्पिक समितीने भारताला ऑलिम्पिक खेळण्याची परवानगी द्यावी अशी टाटांनी मागणी केली. History of Indian Olympic

फेब्रुवारी १९२० मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागाची मान्यता दिली. मार्च महिन्यात दोराब टाटा, ए एस भागवत, डॉ. ए एच ए फैझी, प्रोफेसर मोडक, एस भूत आणि डेक्कन जिमखान्याचे तीन सदस्य यांची समिती नेमली गेली. त्यांनी एप्रिल महिन्यात ऑलिम्पिक सहभागासाठी चाचणी घेण्याचे ठरवले. India performance in Olympic

Sir Dorabji Tata

या चाचणीतून सहा खेळाडूंची निवड झाली, ज्यामध्ये बंगालचे पी सी बॅनर्जी ( स्प्रिंट), बंगळुरूचे पी डी चौगुले ( १० हजार मीटर व मॅरेथॉन), साताराचे सदाशीव दातार ( १० हजार मीटर व मॅरेथॉन), हुबळीचे एड डी कैकाडी ( ५ हजार व १० हजार मीटर) यांच्यासह कोल्हापूरचे दिनकरराव शिंदे व बॉम्बेचे के नवले या कुस्तीपटूंचा समावेश होता. भारताचे ऑलिम्पिकमधील कुस्तीमधील पदार्पण या दोन खेळाडूंमुळे झाले. सोहराब एच भूत हे मॅनेजर होते, तर डॉ. ए एच ए फैझी हे वैद्यकिय अधिकारी व सल्लागार म्हणून संघासोबत गेले होते.

भारताचा ऑलिम्पिक सहभाग निश्चित झाला, कोण जाणार त्याचीही निवड झाली, परंतु खर्चाचं काय? यासाठी दोराब्जी टाटा यांनी ८ हजार रुपयांची मदत केली, भारत सरकारने ६ हजार रुपये दिले आणि बॉम्बेच्या क्रीडा प्रेमींनी मिळून ७ हजार असे एकूण २१ हजार रुपयांची देणगी उभी केली. ५ जूनला बॉम्बेहून हा संघ अँटवर्पच्या दिशेने निघाला. तत्पूर्वी लंडन येथील स्टॅमफोर्ड ब्रिज स्टेडियमवर इंग्लिश कोच एच पॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आठवडे खेळाडूंचा सराव पार पडला. चौघुले यांनी मॅरेथॉनमध्ये आणि दिनकरराव यांनी कुस्तीत चांगली कामगिरी करून दाखवली.

India flag in 1920 olympic

या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भूत यांनी एक अहवाल सादर केला ज्यामध्ये भारत हॉकी आणि कुस्तीमध्ये भविष्यातील ऑलिम्पिकमध्ये यश मिळवू शकतो असे नमूद केले. आगामी ऑलिम्पिक संघांसाठी तांत्रिक, संघटनात्मक आणि प्रशिक्षण समस्यांबाबत शिफारसीही केल्या गेल्या. दोराब्जी टाटा यांच्या सल्ल्यानुसार, तात्पुरत्या भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली गेली. या समितीने १९२४ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ पाठवला आणि १९२७ मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटना बनली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT