Sreeja Akula qualify for Table Tennis Round of 16: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंग शानदार फॉर्मममध्ये आहे. यातच आता बुधवारी आंनदाची बातमी मिळाली आहे. भारताच्या हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.
मंगळवारी भारताने आयर्लंडला २-० अशा गोलफरकाने पराभूत केले होते. त्यानंतर रात्री ऑस्ट्रेलियाला बेल्जियमने ६-२ अशा गोलफरकाने पराभूत केले. त्यामुळे भारत आणि बेल्जियम या दोन संघांनी ग्रुप बीमधून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
ग्रुप बीमध्ये भारताने न्यूझीलंडला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात भारताने १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर भारताने आर्यंलंडला पराभूत केले. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे ७ गुण आहेत. यासह भारत ग्रुप बीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
बेल्जियम तीन विजयांसह ९ गुण मिळवत अव्वल क्रमांकावर आहे. आता भारताचे बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरूद्धचे साखळी फेरीतील सामने बाकी आहेत.
दरम्यान, भारताने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं असल्याने आता ते पदकापासून अजून २ पावले दूर आहेत.
भारताची २६ वर्षीय टेबल टेनिस खेळाडू श्रीजा अकुला हिने देखील बुधवारी इतिहास रचला आहे. तिने सिंगापूरच्या जियान झेंग हिला सहा गेममध्ये पराभूत केले आहे. पहिला गेम पराभूत झाल्यानंतर दमदार पुनरागमन केले आणि ४-२ च्या फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे आता ती उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे.
ती ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचणारी दुसरीच भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्येच मनिका बत्रानेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे श्रीजाने हा पराक्रम तिच्या वाढदिवशी केला आहे. तिचा ३१ जुलै म्हणजेच बुधवारी २६ वा वाढदिवस आहे.
दरम्यान आता उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीजाचा सामना अव्वल मानांकित यिंग्सा सन हिच्याविरुद्ध आज मध्यरात्री १२.३० वाजता होणार आहे.
भारताची बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिनेही महिलांच्या ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल आहे. याशिवाय तिरंदाज दिपीका कुमारीने महिलांच्या एकेरी प्रकारात राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.