Paris Olympic Day 11 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: विनेशनं मेडल पक्कं केलं, पण हॉकी संघाचं सुवर्णपदकाचं स्वप्न तुटलं, कसा होता ११ वा दिवस?

Paris Olympic 2024 Day 11 Result: भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी विनेश फोगटने चौथं मेडल पक्कं केलं. मात्र, हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. एकूणच हा दिवस कसा होता याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

India in Paris Olympic 2024 Day 11 results: पॅरिस ऑलिम्पिकमधील ११ वा दिवस म्हणजेच मंगळवारचा दिवस भारतासाठी अफलातून ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंना पदकांनी थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण मंगळवारच्या कामगिरीने त्यावर फुंकर घातली.

त्यातही कुस्तीपटू विनेश फोगटने हा दिवस गाजवला. तिनं अंतिम सामन्यात प्रवेश मिळवत भारतासाठी चौथं पदक पक्कं केलं आहे. एकूणच हा दिवस कसा राहिला जाणून घेऊ.

टेबल टेनिस

टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला चीनविरुद्ध ०-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय पुरुष संघाचे आव्हान संपले आहे.

ऍथलेटिक्स

ऍथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेकीत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने मंगळवारी पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८९.३४ मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.

मात्र, भारताच्या किशोर जेनाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले. त्याला पहिल्या १२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्याने पात्रता फेरीत सर्वोत्तम ८०.७३ मीटर भाला फेकला.

तसेच ऍथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मीटर शर्यतीतील रेपेचेज राऊंड झाला. यामध्ये पहिल्या हिटमध्ये भारताची किरण पहल सहाव्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे तिला पुढच्या फेरीत जाता आले नाही.

कुस्ती

भारताच्या विनेश फोगटने मंगळवार गाजवलाय. तिने महिलांच्या फ्रिस्टाईल ५० किलो वजनीगटात विनेश फोगटने अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

विनेशचा पहिलाच सामना टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई सुसाकीविरुद्ध होता. या सामन्यात जपानी खेळाडूनं २-० आघाडी घेतलेली. पण शेवटच्या काही क्षणात विनेशने बाजी पालटली आणि ३-२ असा सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व फेरीत विनेशने युक्रेनच्या ओक्साना लिव्हाच विरुद्ध ७-५ अशा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीत तिने क्युबाच्या लोपेझ युस्नीलीस गुझमनविरुद्ध ५-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पदकही पक्कं केलं. ती आता बुधवारी सुवर्णपदकासाठी खेळेल.

हॉकी

भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्ध २-३ अशा गोल फरकाने पराभूत व्हावं लागलं. भारतीय संघाने विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण अखेरच्या ६ मिनिटात जर्मनीने तिसरा गोल करत आघाडी घेतली. त्यानंतरही प्रयत्न करूनही भारताला बरोबरी करता आली नाही.

अखेर भारताचं सुवर्ण पदकाच्या सामन्यात खेळण्याचं स्वप्न तुटलं. पण असं असलं तरी आता कांस्य पदक जिंकण्याची संधी भारताला आहे. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठी स्पेनविरुद्ध खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT