Neeraj Chopra, Kishore Jena Sakal
क्रीडा

Neeraj Chopra: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा, किशोर जेनाची दोहा डायमंड लीगमध्ये परीक्षा, कधी अन् कुठे पाहणार स्पर्धा?

Pranali Kodre

Doha Diamond League: भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा नव्या हंगामाची सुरुवात करण्यास सज्ज आहे. शुक्रवारी (10 मे) होणाऱ्या दोहा डायमंड लीगमध्ये तो सामील होणार आहे. भारताकडून केवळ नीरजच नाही, तर किशोर जेना देखील भालाफेक प्रकारात या स्पर्धेत उतरणार आहे.

नीरजला यापूर्वीही डायमंड लीग स्पर्धेचा अनुभव आहे, मात्र जेना पहिल्यांदाच डायमंड लीग खेळताना दिसणार आहे. दरम्यान, जुलैमध्ये सुरु होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी होणारी ही स्पर्धा नीरज आणि जेना या दोन्ही भारतीयांसाठी महत्त्वाची आहे.

गेल्यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतरची ही दोघांचीही पहिलीच स्पर्धा असणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने सुवर्ण, तर जेनाने रौप्य पदक पटकावले होते. त्यामुळे या दोघांच्याही कामगिरीकडे यंदाच्या हंगामात लक्ष्य राहणार आहे.

दरम्यान, दोहा डायमंड लीगमध्ये 10 भालाफेकपटू सहभागी होणार आहेत. नीरज आणि जेना यांना ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्स, चेक प्रजासत्ताकचा याकूब वालेश यांचे तगडे आव्हान असेल.

युजिन डायमंड लीग 2023 फायनलमध्ये नीरजला वालेशनेच पराभूत केले होते. दरम्यान, गेल्यावर्षी नीरजने दोहा डायमंड लीग जिंकली होती. तसेच नीरजने यापूर्वी 2022मध्ये डायमंड लीगचे तीन वेगवेगळे टप्पे जिंकत ट्रॉफी जिंकली होती. मात्र, त्याला 2023 मध्ये हे विजेतेपद राखण्यात अपयश आले होते.

दरम्यान, आता पुन्हा नीरज डायमंड लीगमध्ये उतरणार असून यावेळी त्याच्यासह भारताचा किशोर जेनाही असणार आहे.

कधी होणार दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीची स्पर्धा?

  • दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीची स्पर्धा 10 मे रोजी होणार आहे.

किती वाजता सुरु होणार स्पर्धा?

  • दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीची स्पर्धा 10 मे रोजी रात्री 10 वाजल्यानंतर सुरु होणार आहे.

डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे पाहाता येईल?

  • भारतात डायमंड लीग स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स18 चॅनेलवर होईल, तर जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवरही या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

भालाफेकमध्ये सहभागी होणारे स्पर्धक

  • नीरज चोप्रा (भारत), जेनकी डीन (जपान), ऑलिव्हर हेलँडर (फिनलँड), किशोर जेना (भारत), अँड्रियन मार्डेर (मोल्दोव्हा, एडिस मातुसेविसियस(लिथुआनिया), अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा), कर्टिस थॉम्पसन (अमेरिका), याकूब वालेश(चेक प्रजासत्ताक), ज्युलियस येगो (केनिया)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT