Neeraj Chopra | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Neeraj Chopra in Paris Olympic: भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिसला रवाना! जाणून घ्या कधी उतरणार मैदानात?

Pranali Kodre

Neeraj Chopra Schedule in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या जोरदार सुरू आहे. अनेक भारतीय खेळाडूही मैदानात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. दुसऱ्याच दिवशी भारताचं पदकांचं खातंही उघडलंय.दरम्यान असं असलं तरी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की अद्याप भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिसमध्ये दिसलेला नाही.

यामागील कारण म्हणजे अद्याप भालाफेकपटू नीरजच्या सामन्यांना वेळ आहे. त्याआधी तो गेल्या काही दिवसांपासून तुर्कीमध्ये सराव करत होता. पण आता तो पॅरिससाठी रवाना झाला आहे. त्याने सोमवारी (२९ जुलै) त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याची पोस्ट शेअर केली आहे.

Neeraj Chopra | Paris Olympic 2024

त्यामुळे लवकरच नीरज पॅरिसमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, यंदा नीरज त्याचं सुवर्णपदक राखण्याचा प्रयत्न करणार आहे. नीरजने २०२१ मध्ये टोकियोत झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.

नीरजने केवळ ऑलिम्पिकच नाही, तर नंतर ऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशीप, आशियाई क्रीडा स्पर्धा, डायमंड लीग अशा मोठ्या स्पर्धाही जिंकल्यात. त्यामुळे यंदाही त्याच्याकडून भारतीयांना मोठ्या आशा आहेत. दरम्यान, त्याला झेक प्रजासत्ताकच्या याकुब वाल्डेचचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

कधी उतरणार मैदानात?

आता नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ६ ऑगस्ट रोजी मैदानात उतरेल. ६ ऑगस्ट रोजी पुरुष भालाभेकीची पात्रता फेरी होणार आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारात ही पात्रता फेरी सुरू होईल. यामध्ये नीरजसह भारताचा किशोर जेनाही सहभागी होणार आहेत.

पात्रता फेरीतून अंतिम फेरीसाठी खेळाडू पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम फेरी ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता चालू होणार आहे. त्यामुळे आता नीरज त्याचं सुवर्णपदक राखणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT