IND vs ENG ESAKAL
क्रीडा

IND vs ENG : 20 वर्षं झाली... इंग्लंडची मुजोरी मोडून काढण्याची टीम इंडियाला आहे संधी

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज आपला वर्ल्डकपमधील सहावा सामना खेळणार आहे. भारताने आतापर्यंतचे आपले पाचही सामने जिंकून 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र आज भारताचा सामना हा गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. गतविजेत्यांना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त एकच सामना जिंकण्यात यश आले आहे.

मात्र भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. न्यूझीलंडप्रमाणेच भारताला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडदेखील कायम जड गेलं आहे. गेल्या 20 वर्षात भारत इंग्लंडला वर्ल्डकपच्या सामन्यात हरवू शकलेला नाही. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारत - इंग्लंड सामना टाय झाला होता.

भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्धचा वर्ल्डकप विजयाचा 20 वर्षापासून सुरू असलेला दुष्काळ संपवला होता. आता अशाच प्रकारे इंग्लंडविरूद्धचा देखील वर्ल्डकमधील 20 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे.

इंग्लंड जरी गतविजेता असला तरी भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्रजांची अवस्था खराब झाली आहे. त्यांना पाच सामन्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे भारत - इंग्लंड सामन्यात भारतीय संघाचेच पारडे जड आहे.

वर्ल्डकप : भारत - इंग्लंड, हेड टू हेड

  • एकूण सामने 8

  • भारत - 3

  • इंग्लंड - 4

  • टाय - 1

  • शेवटचा सामना - 2019 वर्ल्डकप इंग्लंडचा 31 धावांनी विजय

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर होण्यासाठी काहीपण! मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बदलला 'धर्म'; धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Updates : भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीची शक्यता

सौरव गांगुलीची सायबर पोलिसांकडे धाव! यूट्यूबरवर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव पिचवरून आला 'चिप'मध्ये! सचिन तेंडूलकरची RRP कंपनीत आहे मोठी गुंतवणूक

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीकडे तुरुंगातील डॉक्टरांनीच मागितली लाच

SCROLL FOR NEXT