भारताच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज बनलेल्या मोहम्मद शमीचा प्रवास खास असाच आहे. खरंतर शमीचं घर म्हणजे जलदगी गोलंदाजांची फौजच. वडीलांसह त्याचे भाऊही गोलंदाजीमध्ये तरेबज होते. पण त्यांना जे जमलं नाही ते शमीनं करुन दाखवलं. सध्याच्या घडीला मोहम्मद शमी (Mohammed Shami) टीम इंडियाचा (Team India) पहिल्या पसंतीचा गोलंदाज आहे. इंग्लंड विरुद्धच्या द ओव्हलच्या (The Oval) मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात किरकोळ दुखापतीमुळे तो खेळू शकलेला नाही. टीम इंडियातील रिव्हर्स स्विंगचा बादशहा अशी ओळख निर्माण करणाऱ्या शमी आज 31 वर्षांचा झालाय. त्याचा आज बर्थडे आहे. त्यानिमित्ताने नजर टाकूयात त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासावर...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आठ वर्षांच्या कारकिर्दीत शमीने आगळा वेगळा थाट निर्माण केलाय. आता तो टीम इंडियातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असला तरी त्याचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. शमी हा मुळचा उत्तर प्रदेशचा. पण त्याला त्याच्या राज्याकडून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली नाही. युपीतील अलमोरा जिल्ह्यातील सहसपुर या छोट्याशा गावातून तो आलाय. त्याचे वडीलही तरुणपणी क्रिकेट खेळायचे. ते जलदगती गोलंदाज होते. त्यामुळेच कदाचित शमीसह त्याचे भाऊही जलदगती गोलंदाजीकडे वळले.
2005 मध्ये शमीच्या गोलंदाजीत चुणूक दिसल्यावर त्याचे वडील तौशीफ अली यांनी त्याला मोरादाबाद क्रिकेट अकादमीत दाखल केले. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने शमीच्या कामगिरीची दखलच घेतली नाही. 19 युपीसाठी 19 वर्षांखालील संघात निवड न झाल्याने निराश न होता शमी पश्चिम बंगालच्या दिशेला वळला. पश्चिम बंगालमधील लोकल क्लबकडून खेळताना त्याला सौरव गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. सौरव गांगुलीला नेट्समध्ये केलेली गोलंदाजी त्याच्यासाठी टर्निंग पाँइट ठरली. त्याच्या गोलंदाजीने गांगुली प्रभावित झाला. दादाने बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्टर्संना शमीच्या कामगिरीवर लक्ष ठेवायला सांगितले. 2010 मध्ये शमीला बंगालच्या रणजी संघात स्थान मिळाले.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण आणि रेकॉर्ड
रणजी सामन्यातील कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शमीचे दरवाजे खुले झाले. 2013 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात शमीने 4 मेडन ओव्हर टाकून खास विक्रम नोंदवला. अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. नोव्हेंबर 2013 मध्ये शमीनं वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. कोलकाताच्या मैदानात झालेल्या या सामन्यात त्याने 118 धावा खर्च करुन 9 विकेट घेतल्या होत्या. गुडघ्या दुखापतीनं त्रस्त असताना शमी 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. यावेळी त्याने 17.29 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या. 2019 मध्ये शमीनं जलद 100 वनडे घेण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हॅटट्रिकची कामगिरी नोंदवली होती. हा एक विक्रमच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.