IND-PAK WC 2023 Sakal
क्रीडा

IND-PAK WC 2023 : अहमदाबादमधील भारत-पाक वर्ल्डकप लढत १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होण्याची शक्यता

घटस्थापनेचा नव्हे आता अमावस्येचा मुहूर्त?

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बहुचर्चित भारत-पाक साखळी सामन्याची तारीख अधिकृतपणे जाहीर होण्याअगोदर क्रिकेट विश्वाला कळली होती. १५ ऑक्टोबर हा घटस्थापनेचा खास दिवस या सामन्यासाठी होता; परंतु या तारखेत बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि आदल्या दिवशी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी ही लढत होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे.

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वांना वेध लागले आहेत ते नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाक सामन्याचे. या सामन्यासाठी १५ ऑक्टोबर (रविवार) या खास दिवसाची निवड करण्यात आली होती. याच दिवसापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून हा सण अहमदाबादमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र हा उत्सव साजरा करताना इतराना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आदल्या दिवशी हा सामना आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

१५ ऑक्टोबर रोजी सामना झाल्यास दीड लाखांपेक्षा अधिक क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये असतील, त्याच दिवशी नवरात्रोसवासाठी इतरही लोक रस्त्यांवर असू शकतील, त्यामुळे कदाचित सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षणाची गरज लागू शकते. हा सर्व विचार करून सुरक्षा सल्लागारांनी सामन्याची तारीख बदलण्याची सूचना केल्याचे कळते.

सर्व बाबींचा विचार करण्यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने खात्रिलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामन्याचे ठिकाण कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येणार नसून हा सामना अहमदाबादमध्येच होणार आहे.

पाकवर परिणाम?

सामन्याची तारीख एक दिवसाने अगोदर आणल्याचा परिणाम भारतीय संघावर होणार नाही. कारण भारत आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला खेळणार आहे. मात्र पाकिस्तान त्यांचे पहिले दोन सामने ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी सामना आयोजित केल्यास त्यांच्यासमोर फारच कमी वेळ शिल्लक असेल.

अमावस्या आणि सूर्यग्रहण

१४ ऑक्टोबर या दिवशी अमावस्या तर आहेच, पण कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याचा उल्लेख आहे, पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा परिणाम सामन्यावर होणार नाही. एरवी ग्रहणाच्या दिवशी सामने आयोजित केले जात नाहीत. दुपारी १.३० ही सामन्याची वेळ आहे. ग्रहण भारतातून दिसले असते तर निश्चितच या दिवशी सामना शक्य झाला नसता.

हॉटेल आरक्षणाची फिरवाफिरव?

१५ ऑक्टोबर ही तारीख जाहीर होताच अहमदाबादमधील हॉटेल आरक्षणाच्या किमतीने एका दिवसासाठी अर्ध्या लाखापर्यंत उच्चांक गाठला होता. अजून सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली नसली तरी अनेकांनी आपले ट्रॅव्हल प्लॅन तयार केले होते, पण आता नव्याने प्लॅन तयार करावे लागणार आहेत.

बीसीसीआयची उद्या बैठक

विश्वकरंडक स्पर्धा आयोजनाची मोहीम बीसीसीआय उद्यापासून सुरू करत असून संबंधित सर्व घटकांची उद्या नवी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ज्या सर्व राज्य संघटनांकडे सामने होणार आहेत त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत भारत-पाक लढतीच्या संभाव्य तारीख बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नियोजनाच्या कामाचे वर्गीकरण करण्यासाठी आणि सुलभता येण्यासाठी उप समित्या स्थापन केल्या जातील, ज्यामुळे नियोजन सोपे होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT