iNDIA rOUND DAY6 esakal
क्रीडा

India at Paris Olympic 2024 : ७२ वर्षांचा महाराष्ट्राचा दुष्काळ संपला! स्वप्नील, लक्ष्य यांच्या व्यतिरिक्त भारताच्या हाती निराशा

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील सहावा दिवस भारतासाठी पदकाचा राहिला असला तरी बाकी खेळांमध्ये निराशा हाती लागली. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ( Swapnil kusale) नेमबाजीत विक्रमी कांस्यपदक जिंकले. पण, बॉक्सिंगमध्ये निखत जरीन आणि बॅडमिंटनमध्ये फॉर्मात असलेली सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या पदकाच्या दावेदारांना गाशा गुंडाळावा लागला. पुरुष हॉकी संघाची अपराजित मालिका खंडित झाली, तर लक्ष्य सेनने भारताच्याच खेळाडूला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सात्विक व चिराग कडवी झुंज

भारताच्या पुरुष दुहेरी गटात खेळणारी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या चिआ आरोन व सोह वूई यिक यांनी पुनरागमन करताना १३-२१, २१-१४, २१-१६ अशा फरकाने भारतीय जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीत भारत वि. भारत

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन व एच एस प्रणॉय हे भारतीय खेळाडू समोरासमोर होते. त्यामुळे एक भारतीय स्पर्धेबाहेर जाईल हे पक्कं होतं. लक्ष्य सेनने पहिला गेम २१-१२ असा जिंकून त्याचा फॉर्म कायम राखला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने १४-४ अशी मजबूत आघाडी घेताना विजयाच्या दिशेने कूच केले.

निराशा, निराशा अन् निराशा...

पुरुषांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या विकास सिंग ( १:२२:३६ मि.), परमजीत सिंग बिस्त ( १:२३:४८ मि.) यांना अनुक्रमे ३० व ३७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आकाशदीप सिंगला शर्यत पूर्ण करता आली नाही. महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांकाला ४१ व्या स्थानावर राहिली.

बॉक्सिंगमध्ये निखत जरीनला अव्वल मानांकित वू यू ( चीन) कडून ०-५ अशी हार मानावी लागल्याने पदकाच्या शर्यतीतून ती बाद झाली आहे. तेच तिरंदाजीत चीनच्या काओ वेनचाओने ६-० अशा फरकाने प्रविण जाधवचा पराभव केला.

हॉकीत कडवी टक्कर...

पुरूष हॉकी संघाची अपराजित मालिका खंडित झाली. तगड्या बेल्जियमला कडवी टक्कर देऊनही भारताला २-१ ने पराभव पत्करावा लागला. भारताला १८व्या मिनिटाला अभिषेकने आघाडी मिळवून दिली. पण, तिसऱ्या व चौथ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने पुनरागमन केले. ३३व्या मिनिटाला स्टॉकब्रॉक्स थिबीयू व ४४व्या मिनिटाला डोहमेन जॉन यांनी गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने शेवटपर्यंत बरोबरीचा गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु त्यांच्या वाट्याला अपयश आले. भारताचा पुढील सामना २ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

सेलिंग: भारताच्या विष्णु सरवानन याने पहिल्या शर्यतीत दहावे स्थान पटकावले, परंतु दुसऱ्या शर्यतीत तो ४४ खेळाडूंमध्ये ३४वा आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव नौकानयनपटू होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : अमेरिकेत फेलोशिपसाठी आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची नियुक्ती; भारतातून निवड झालेल्या ठरल्या एकमेव अधिकारी

SCROLL FOR NEXT