Manu Bhaker in Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: मनु भाकर फायनलमध्ये! नेमबाज इतिहास रचणार, एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करणार?

Pranali Kodre

Manu Bhaker eyes on Third Medal in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरसाठी यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेत तिनं आत्तापर्यंत दोन पदकं जिंकली असून आता तिने तिसरं पदक जिंकण्याच्यादृष्टीनेही आगेकूच केली आहे.

तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. शुक्रवारी (२ ऑगस्ट) मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकाराच्या क्वालिफायर्समध्ये सहभागी झाली होती. तिने या क्वालिफायर्समध्ये दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

तिने या क्वालिफायर्समध्ये प्रिसिजन स्टेजमध्ये २९४ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तिने रॅपिड स्टेजमध्ये २९६ गुण मिळवले. या स्टेजनंतर ती एकूण ५९० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

याच स्पर्धेत भारताची इशा सिंगही सहभागी झाली होती. पण ती क्वालिफायर्समध्ये १८ व्या क्रमांकावर राहिली. तिने प्रिसिजन स्टेजमध्ये २९१ गुणांसह १० वा क्रमांक मिळवलेला होता. त्यानंतर तिला रॅपिड स्टेजमध्ये २९० गुण मिळवता आले. त्यामुळे एकूण ५८१ गुण तिला मिळवता आले. यामुळे आता इशाचे या प्रकारातील आव्हान संपुष्टात आले आहे.

या प्रकारात क्वालिफायर्समध्ये प्रिसिजन आणि रॅपिड अशा दोन स्टेजमध्ये मिळून एकूण ६० शॉट्स प्रत्येक खेळाडूला मारायचे होते. त्यानंतर सर्वोत्तम गुण असलेल्या अव्वल ८ खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

मनू भाकरच्या नावे दोन पदके

मनू भाकरने यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिल्यांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर तिने नेमबाज सरबज्योत सिंग याच्या साथीने मिश्र दुहेरी मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी एकमेव भारतीय आहे.

मनू भाकर रचणार इतिहास?

मनू भाकरने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक जिंकलं, तर ती ऑलिम्पिकमध्ये तीन वैयक्तिक पदके जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरेल. तसेच ऑलिम्पिकच्या इतिहासात एकाच वर्षात तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची एकमेव खेळाडूही ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT