Ollie Robinson Twitter
क्रीडा

8 वर्षांची बंदी 8 मॅचवर; टीम इंडियाविरुद्ध रॉबिन्सन खेळणार?

वर्णभेदी टिप्पणीच्या आरोपामुळे पहिल्या सामन्यानंतरच त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती.

सुशांत जाधव

वर्णभेदी टिप्पणीमुळे पदार्पणाच्या सामन्यातच 8 वर्षांच्या बंदीला समोरे जाण्याची नामुष्की ओढावलेल्या इंग्लिश क्रिकेटरला मोठा दिलासा मिळालाय. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून नवोदित ओली रॉबिन्सने (Ollie Robinson) सात विकेट घेत दमदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यातील पहिल्याच दिवशी तो मैदानातील कामगिरी ऐवजी जुन्या आक्षेपार्ह ट्विटमुळे चर्चेत आला. वर्णभेदी टिप्पणीच्या आरोपामुळे पहिल्या सामन्यानंतरच त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कठोर पावले उचलत त्याला आठ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. (India Tour Of England Ollie Robinson Can Play For England Though 8 Years Ban Controversial Comments)

क्रिकेट शिस्त अयोगाच्या समितीच्या सुनावणीनंतर आता त्याचा पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झालाय. क्रिकेट शिस्त आयोगाने त्याच्यावर 8 सामन्यांची बंदी घातली आहे. याशिवाय त्याला 3200 पाउंड म्हणजेच जवळपास 3.29 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापासून तो संघाबाहेर आहे. त्यानंतर टी-20 ब्लास्टमधील दोन सामन्यातून रॉबिन्सनला माघार घ्यावी लागली होती. क्रिकेट डिसीप्लेन कमिटीने या तीन सामन्यांचाही 8 सामन्यांच्या बॅनमध्ये समावेश केलाय. उर्वरित 5 सामन्यांवरील बंदीचा निर्णय हा पुढील दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आलाय. त्यामुळे रॉबिन्सन आता भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही उपलब्ध असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी त्याला संघात संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने कसोटी पदार्पण केले होते. 27 वर्षीय गोलंदाजाने आपल्या पहिल्या वहिल्या सामन्यात 7 विकेट घेऊन चांगली सुरुवातही केली. पण जुन्या आक्षेपार्ह ट्विटमुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाईला समोरे जावे लागले. 2012 ते 2014 दरम्यानच्या कालावधीत त्याने काही वादग्रस्त ट्विट केले होते. यासंदर्भात त्याने पदार्पणाच्या सामन्यात माफीही मागितली होती. त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर इंग्लंडच्या क्रीडा मंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली होती. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन यांनी क्रीडा मंत्र्यांच्या सूरात सूर मिसळत त्याच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर पुन्हा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली होती. या वादावर आता पडदा पडला असून अखेर त्याचा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT