India U-19 Squad esakal
क्रीडा

India U-19 Squad : बीडचा सचिन अन् सोलापूरच्या अर्शिनची वर्ल्डकप संघात वर्णी, महाराष्ट्र - मुंबईच्या तीन खेळाडूंना संधी

अनिरुद्ध संकपाळ

India U-19 Squad : बीसीसीआयने नुकतेच 19 वर्षाखालील भारतीय संघाची घोषणा केली. हा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्धची ट्राय सिरीज आणि आयसीसी 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

भारताच्या या 19 वर्षाखालील वर्ल्डकप संघात महाराष्ट्र अन् मुंबईच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. यात सोलापूरचा अष्टपैलू खेळाडू अर्शीन कुलकर्णी आणि बीडच्या सचिन धसचा देखील समावेश आहे. तर संघाच्या नेतृत्वाची धुरा उदय सहारन याच्या खांद्यावर आहे.

यंदाचा 19 वर्षाखालील वर्ल्डकप हा आधी श्रीलंकेत होणार होता. मात्र सरकारचा अवाजवी हस्तक्षेप होत असल्याने आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डच बर्खास्त केल्याने या वर्ल्डकपचे यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेला देण्यात आलं आहे. यावर्ल्डकपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिका खेळणार आहे. यात भारताशिवाय यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघाचा समावेश असणार आहे.

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय 19 वर्षाच्या संघाचा उपकर्णधार हा कुमार पांडे आहे. याचबरोबर संघातील 15 खेळाडूंव्यतिरिद्त प्रेम देवकर, अशं गोसाई आणि मोहम्मद अमान या तीन स्टँड बाय खेळाडूंची देखील निवड करण्यात आली आहे. ते संघासोबत प्रवास करणार आहेत.

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 चा भारतीय संघ संघ :

उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर, अवनीश राव, सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला.

स्टँड बाय खेळाडू : दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विघ्नेश, किरण चोरमले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT