India Vs Afghanistan ODI World Cup 2023 esakal
क्रीडा

IND vs AFG CWC23 : भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्स राखून केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Afghanistan ODI World Cup 2023 : भारताने अफगाणिस्तानचे 273 धावांचे आव्हान 35 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 87 चेंडूत 131 धावांची तुफानी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याने इशान किशन सोबत 156 धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीने देखील 65 चेंडूत नाबाद 55 धावा करत विजयाला हातभार लावला. अफगाणिस्तानकडून भारताच्या दोन्ही विकेट्स या राशिद खानने घेतल्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने 50 षटकात 7 बाद 272 धावा केल्या. कर्णधार हाश्मतुल्ला शाहिदीने झुंंजार 80 धावांची खेळी केली. त्याने अजमतुल्ला ओमरजाई (62) सोबत चौथ्या विकेटसाठी 121 धावांची दमदार भागीदारी रचली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेत दमदार गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने देखील 2 विकेट्स घेत महत्वाच्या क्षणी भारताला विकेट्स मिळवून दिल्या.

272-8 (50 Ov) : रोहित शर्माचे शतक, भारताचा मोठा विजय

रोहित शर्माने 84 चेंडूत 131 धावांची खेळी करत भारताला 273 धावांचे आव्हान 35 षटकातच पार करून दिले. विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत विजयात आपले योगदान दिले.

IND 76/0 (8.1) : रोहितचा धुमधडाका

रोहित शर्माने अफगाणिस्तानविरूद्ध दमदार सुरूवात करून देत 30 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

261-8 : स्लॉग ओव्हरमध्ये भारत वरचढ

कर्णधार शाहिदी 80 धावा करून बाद झाल्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुमराहने मोहम्मद नबी (19), नजीबुल्ला झारदान (2), राशिद खान (16) तीन विकेट्स घेतल्या.

225-5 : अखेर कर्णधार झाला शांत

अफगाणिस्तानचा कर्णधार हाश्मतुल्ला शाहिदीने झुंजार खेळी करत 88 चेंडूत 80 धावा केल्या. अखेर कुलदीप यादवने शाहिदीला बाद करत अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला. हा धक्का 42 व्या षटकात आल्याने स्लॉग ओव्हरमध्ये अफगाणिस्तानची अडचण झाली आहे.

184-4 : अखेर हार्दिक पांड्याने जोडी फोडली

अफगाणिस्तानचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार हाश्मतुल्ला शाहिदी आणि अझमतुल्ला ओमराजाई यांनी डाव सावरत संघाला 200 च्या जवळपास पोहचवले. त्यांनी 121 धावांची भागीदारी रचली. अखेर ही जोडी हार्दिक पांड्याने फोडली. त्याने 62 धावांवर खेळणाऱ्या अझमतुल्लाचा त्रिफळा उडवला.

अफगाणिस्तानचे शतक पूर्ण 

अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद 63 धावा अशी झाली असताना कर्णधार हाश्मतुल्ला शाहिदी आणि अझरतुल्ला अमरझाई यांनी डाव सावरत अफगाणिस्तानला शतक पार करून दिले.

63-3 : तीनही वेगवान गोलंदाजांनी उघडले खाते

जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिल्यानंतर हार्दिक पांड्याने दुसरा सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाजला 21 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर लगेचच शार्दुल ठाकूरने रेहमत शाहच्या रूपाने (16) तिसरा अफगाण पॅव्हेलियनमध्ये पाठवला.

32-1 :अफगाणिस्तानला पहिला धक्का 

जसप्रीत बुमराहने इब्राहीम जादरानला 22 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

अफगाणिस्तानची सावध सुरूवात 

अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमनुल्ला गुरबाद आणि इब्राहीम झादरान यांनी सावध सुरूवात करत पहिल्या 6 षटकात 28 धावा केल्या.

 भारतीय संघात एक बदल 

रविचंद्रन अश्विनच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देत रोहित शर्माने अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी संघात एक बदल केला.

नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकली

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT