IND vs AUS 4th Test India Playing 11  esakal
क्रीडा

IND vs AUS 4th Test Playing 11 : चौथ्या कसोटीत सूर्या खेळणार; रोहित शर्मा गोलंदाजीत घेणार मोठी रिस्क?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 4th Test India Playing 11 : बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चौथा आणि निर्णायक कसोटी सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येत्या 9 मार्चपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. चौथा कसोटी सामना जिंकून 2 - 1 अशी असलेली मालिका पाहुणे बरोबरीत सोडवण्याच्या प्रयत्नात असतील.

दुसरीकडे भारताच्या दृष्टीकोणातून चौथी कसोटी जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. यावरच WTC फायनलचे भारताचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. भारतीय संघ व्यवस्थापन यासाठीच चौथ्या कसोटीत तगडी प्लेईंग 11 मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

प्लेईंग 11 मध्ये दोन जागांसाठी संभ्रमावस्था आहे. सलामीला शुभमन गिलला अजून संधी मिळणार की केएल राहुलला व्यवस्थापन पुन्हा संघात घेणार हा एक प्रश्न आहे. तसेच एनसीएच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार मोहम्मद सिराजला विश्रांती देण्याची शक्यता आहे.

त्याच्या जागी तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिलेला मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहमदाबाद कसोटीत एक अतिरिक्त फलंदाज घेऊन मैदानात उतरायचे का यावरही टीम इंडिया विचार करेल. अशा परिस्थिती सूर्यकुमार यादव संघात येऊ शकतो. मात्र हे सगळे बदल अहदाबादची खेळपट्टी पाहूनच केले जातील.

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला खेळपट्टीबाबत माहिती दिली. GCA चे सूत्र म्हणतात 'आम्ही या कसोटीसाठी स्पोर्टी खेळपट्टी तयार करणार आहोत. आमच्याकडे स्टेडियमच्या मध्यभागी काळ्या मातीची आणि लाल मातीची अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्टी आहेत. या कसोटीसाठी कोणती खेळपट्टी तयार करायची हे लवकरच ठरवण्यात येईल.'

इंदूर कसोटीत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स राखून पराभव केला. यामुळे रोहित शर्माच्या संघाने अहमदाबादचा प्लॅन बदलला. जर इंदूर कसोटी जिंकली असती तर इंग्लंडमधील ओव्हलवर होणाऱ्या WTC च्या अंतिम सामन्याचा सराव अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात येणार होता. यासाठी वेगवान गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी तयार करण्यात येणार होती.

भारत अहदमाबाद कसोटीत अतिरिक्त फलंदाज खेळवणार?

- खेळपट्टी कशी आहे यावर अहमदाबाद कसोटीत अतिरिक्त फलंदाज खेळणार की नाही हे ठरेल.

- फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारताची फलंदाजी ढेपाळते. त्यामुळे अतिरिक्त फलंदाजाची गरज भासू शकते.

- रोहित शर्मा आणि अक्षर पटेललाच या कसोटी मालिकेत 30 पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा करता आल्या आहेत.

- जरी अक्षर पटेल गोलंदाजीत काही कमाल करू शकलेला नसला तरी तो फलंदाजीत तळातील फलंदाजांना घेऊन चांगली फलंदाजी करत आहे.

- मोहम्मद सिराजच्या ऐवजी मोहम्मद शमी खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ अतिरिक्त फलंदाज घेऊन मैदानात उतरू शकतो.

- अशा परिस्थिती सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. तो मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करू शकतो

चौथ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग 11

  • रोहित शर्मा (कर्णधार)

  • शुभमन गिल

  • चेतेश्वर पुजारा

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • सूर्यकुमार यादव / उमेश यादव

  • रविंद्र जडेजा

  • श्रीकार भरत (यष्टीरक्षक)

  • अक्षर पटेल

  • रविचंद्रन अश्विन

  • मोहम्मद शमी

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT