India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी 20 सामना आत बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. भारताने मालिका आधीच 3 - 1 अशी खिशात टाकली आहे. त्यामुळे आजचा सामना ही एक औपचारिकता राहिला आहे.
भारताला आजच्या सामन्यात टी 20 वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून आपल्या संघात काही बदल करून खेळाडूंना आजमावण्याची संधी आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने आपल्या संघात 4 बदल केले होते. त्यामुळे भारत आजच्या सामन्यात देखील बेंच स्ट्रेंथ आजमावून पाहू शकतो.
दक्षिण अफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरला आजच्या सामन्यात आजमावून पाहू शकतो. वॉशिंग्टन सुंदर देखील दुखापतीमुळे बराचकाळ संघाच्या बाहेर होता. आजच्या सामन्यात त्याला अक्षर पटेल किंवा रवी बिश्नोईच्या जागेवर संधी मिळू शकते. त्याचा फिटनेस आणि फॉर्म देखील तपासला जाईल.
चौथ्या टी 20 सामन्यात श्रेयस अय्यर आणि दीपक चाहर यांना संधी देण्यात आली होती. त्यांनी दोघांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र आजच्या सामन्यात ते आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील.
या दोघांची निवड दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर झाली असून तेथे भारत 10 डिसेंबरपासून टी 20 मालिका खेळणार आहे.
यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर / तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल / वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
जॉश फिलिप्स, ट्रॅविस हेड, बेन मॅकडरमोट, एरॉन हार्डी, टीम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, बेन ड्वारशुईस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरनडोर्फ, तनवीर संघा / नाथन एलिस / केन रिचर्डसन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.