India vs Australia T20 Series  sakal
क्रीडा

Team India : रोहित अँड कंपनीला आता श्वास घेणं होणार कठीण? वर्ल्डकप 2023 नंतरही खेळणार ही सीरीज

Kiran Mahanavar

India vs Australia T20 Series : भारतीय क्रिकेट संघासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत खूप व्यस्त आहे. पुढील 4-5 महिन्यांचे वेळापत्रक पूर्णपणे भरलेले आहे. WTC फायनलमधील पराभव विसरून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 T20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे.

यानंतर संघाला आयर्लंडला जायचं आहे, मग आशिया कप खेळायचा आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका पण खेळणार आहे. त्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाचे वर्ल्ड कप पर्यंतचे वेळापत्रक हे पूर्णपणे टाइट आहे. दरम्यान वर्ल्ड कप संपल्यानंतरही टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू शकते.

टीम इंडियाच्या 2024 टी-20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या या मालिकेने होईल. या मालिकेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र नोव्हेंबरच्या अखेरीस ही मालिका होण्याची शक्यता आहे. या ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकापूर्वी आणि विश्वचषकानंतर भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार आहे. या वेळापत्रकासाठी ऑस्ट्रेलियन संघ सुमारे 4-5 महिने भारतात असेल.

2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खूप क्रिकेट खेळले गेले आहे. या दोन संघांमध्ये डब्ल्यूटीसी फायनलही झाली. त्याआधी ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. भारतीय संघ 2023 च्या वर्ल्ड कपची सुरुवातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. या दोघांचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला एकमेकांविरुद्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT